मुंबई: आघाडीचा उद्योग समूह रिलायन्स समूहातील जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने शेअर दलाली अर्थात ‘ब्रोकिंग’ व्यवसायात पाऊल टाकले आहे. जागतिक वित्तीय सेवा आणि मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रातील दिग्गज ब्लॅकरॉकसह हा तिचा संयुक्त उपक्रम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिओ फायनान्शियल आता ‘जिओ ब्लॅकरॉक ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने ब्रोकिंग व्यवसायात दाखल झाली आहे. ब्लॅकरॉकसह हा ५०:५० अशा समान भागीदारीचा उपक्रम जुलै २०२२ मध्ये स्थापण्यात आला. दोन्ही कंपन्यांनी डिजिटल-फर्स्ट वेल्थ मॅनेजमेंट आणि ब्रोकिंग मंच सादर करण्यासाठी या संयुक्त कंपनीत प्रत्येकी १,३०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. जिओ फायनान्शियलने म्युच्युअल फंड व्यवसायातही पाय रोवायला सुरुवात केली आहे. ब्लॅकरॉकशी भागीदारीनेच म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्यासाठी तिला ऑक्टोबर २०२४ मध्ये ‘सेबी’कडून तत्वतः मान्यता मिळाली आहे.

हेही वाचा :प्रस्तावित वॉटर टॅक्सी सेवेसाठी ‘एफआरपी’ सामग्रीवर भर – गडकरी

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक आधारावर ३.१३ टक्क्यांनी वाढून ६८९.०७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो याआधीच्या दुसऱ्या तिमाहीत ६६८.१८ कोटी रुपये होता. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत तो ६०८.०४ कोटी रुपये नोंदवला गेला होता.

हेही वाचा :‘एसबीआय निफ्टी बँक इंडेक्स फंड’ गुंतवणुकीस खुला

समभागांत घसरण, आगामी अंदाज काय?

जिओ फायनान्शियलचा समभाग मंगळवारच्या सत्रात ५.८६ टक्क्यांनी घसरून २५९.६० रुपयांवर बंद झाला. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत समभागाने २०.६३ टक्के नकारात्मक परतावा दिला आहे, तर गत एका महिन्यांत तो १४.८४ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. सध्याच्या बाजार भावानुसार कंपनीचे १.६४ लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल आहे. विविध दलाली पेढ्या आणि विश्लेषकांनी जिओ फायनान्शियलच्या शेअरचे सरासरी लक्ष्य ३४६ रुपये अंदाजले आहे. या अंदाजानुसार २५९.६० रुपयाच्या बंद भावात ३३.२ टक्क्यांची वाढ शक्य दिसून येते.