scorecardresearch

बजाज फिनसर्व्ह अ‍ॅसेट मॅनेजमेंटतर्फे नव्या फंडाचा शुभारंभ; वर्तणूक शास्त्रावर आधारित भारताचा पहिला फंड

वर्तणुकीशी संबंधित मानसशास्त्र आणि वित्तीय अंतरंगाशी संबंधित निकष यांच्या आधारे तयार केलेल्या विशेष गुंतवणूक पद्धतीचा वापर बजाज फिनसर्व्ह (बॅफ) करते.

new fund by Bajaj Finserv
(फोटो क्रेडिट- फायनान्शिअल एक्सप्रेस)

बजाज फिनसर्व्ह अ‍ॅसेट मॅनेजमेंटने गुंतवणूकदारांसाठी बजाज फिनसर्व्ह बॅलन्स्ड ऍडव्हॉन्टेज फंड या नवीन फंडचा प्रारंभ केला असून, ही मुदतमुक्त श्रेणीतील लवचिक गुंतवणूक योजना आहे. समभाग आणि समभागांशी संबंधित वायदे (डेरेव्हेटीव्हज) तसेच स्थिर उत्पन्न घटक यातच गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही योजना तयार करण्यात आलेली आहे.

वर्तणुकीशी संबंधित मानसशास्त्र आणि वित्तीय अंतरंगाशी संबंधित निकष यांच्या आधारे तयार केलेल्या विशेष गुंतवणूक पद्धतीचा वापर बजाज फिनसर्व्ह (बॅफ) करते. गुंतवणुकीची ही पद्धत वापरल्याने बाजारातील अस्थिरतेतून व्यवस्थितरीत्या मार्गक्रमण करणे आणि जास्तीत जास्त परतावा हे लाभ गुंतवणूकदारांना मिळू शकतात. निधीचे वाटप करण्यासाठी केवळ संख्यात्मक प्रारूप (मॉडेल) वापरण्याऐवजी बजाज फिनसर्व्ह एएमसीचा गुंतवणूक चमू वर्तणुकीशी संबंधित बाबींचेही विश्लेषण करतो आणि त्यामुळे दीर्घ कालावधीत गुंतवणूकदारांना उत्तम परतावा मिळण्यास मदत होते.

s.s. swaminathanProfessor M S Swaminathan, Farmer , Farmer Scientist ,revolution in agriculture
एम. एस. स्वामिनाथन.. शेतकऱ्यांचे शास्त्रज्ञ
Chandrayaan 3 Update To Finish As Sun Sets On Moon Surface Vikram Pragyan sleep What Will Happen To mission by ISRO
चंद्रावर सूर्यास्त! Chandrayaan-3 विषयी मोठी अपडेट, ‘विक्रम’-‘प्रज्ञान’ला जाग आली का? मोहिमेचं पुढे काय होणार?
Financial Planning
UPSC-MPSC : आर्थिक नियोजनाची सुरुवात कधी आणि कुठे झाली?
car testing dummy lady
मोटार अपघाताबाबतच्या सुरक्षा टेस्टिंगमध्ये स्त्री डमी वापरूनही अभ्यास!

मूलभूत निकष, गत कामगिरी आणि संख्यात्मक प्रारुप यांच्याआधारे गुंतवणूक निधीचे वाटप ही पारंपरिक पद्धत वापरली जाते. परंतु निधीचे वाटप आणि गुंतवणुकीची वेळ निश्चित करण्यासाठी वर्तणूकशास्त्रावर आधारित प्रारुपांची मदत घेण्यावर बजाज फिनसर्व्ह एएमसीचा गुंतवणूक चमू अधिक विश्वास ठेवतो. भविष्यातील प्रतिसमभाग कमाई, वाढीचा अंदाज आणि व्याजदर याआधारे बजाज फिनसर्व्ह एएमसी बॅफचे मॉडेल योग्य बाजार मूल्य निश्चित करते आणि त्याआधारे मुख्य गुंतवणूक धोरणाची दिशा निश्चित केली जाते. फंडासाठी तयार करण्यात आलेले वर्तणुक निकष बाजारातील अस्थिरतेतून वाटचाल करण्यास मदत करतात आणि योग्य वेळेला प्रवेश करणे आणि बाहेर पडणे यात उत्तम ताळमेळ साधत अधिकाधिक परतावा निश्चित करण्यासही हातभार लावतात. तसेच हे निकष समभागातील गुंतवणुकीला दिशा दाखवतात. बाजार नीचांकी पातळीवर असताना गुंतवणूक वाढविली जाते आणि बाजाराचे मूल्यांकन उच्च पातळीवर असताना गुंतवणुकीत कपात केली जाते.

नवीन फंडाच्या शुभारभप्रसंगी बोलताना बजाज फिनसर्व्ह ऍसेट मॅनेजमेंटचे सीईओ गणेश मोहन म्हणाले, “बाजारात आम्ही नवीन खेळाडू असलो तरी बाजाराकडे अतिशय नव्याने पाहण्याची आम्हाला संधी आहे. आमची बॅफ ही या दृष्टिकोनाचे एक सुंदर उदाहरण आहे. आमच्या दृष्टिकोनात वर्तणूक शास्त्र आणि वित्तीय निकष यांचा उत्तम ताळमेळ साधला जातो आणि त्यामुळे आम्हाला गुंतवणूक निर्णय घेण्यास मदत होते. आमती इनक्यूब ही आगळीवेगळी गुंतवणूक पध्दत माहिती, गुणवत्ता आणि वर्तणुक यांचा मिलाफ घडवून आणत अल्फा परतावा प्रदान करते. आमच्या जवळपास सर्व गुंतवणूक प्रकारांसाठी हा मुख्य आधार ठरलेला आहे आणि आमच्या बॅलन्स्ड ऍडव्हान्टेज फंडात वर्तणुकीशी संबंधित निकषांचा अतिशय सकारात्मक परिणाम आपणा सर्वांना पाहता येईल. मला खात्री आहे की, वर्तणुकीशी संबंधित अनेक संकल्पना आणि गुंतवणूक प्रकार आपणास पाहण्यास मिळतील आणि भविष्यात त्यांचीच चर्चा राहील.” नवीन फंडातील समभाग विभागाचे व्यवस्थापन संयुक्तपणे निमेश चंदन आणि सौरभ गुप्ता हे सांभाळणार असून, डेट विभागाचे व्यवस्थापन सिद्धार्थ चौधरी हे सांभाळतील. नवीन फंड गुंतवणुकीसाठी २४ नोव्हेंबरला सुरू होत असून, ८ डिसेंबर २०२३ ला बंद होत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Launch of new fund by bajaj finserv asset management india first fund based on behavioral science vrd

First published on: 21-11-2023 at 19:50 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×