scorecardresearch

Premium

 ‘आरबीएल’मधील हिस्सा आणखी न वाढवण्याचे ‘महिंद्र’कडून संकेत

भारतीय बँकिंग नियमन कायद्यानुसार बड्या उद्योग समूहांना बँकिंग क्षेत्रात मोठी गुंतवणूक करता येत नाही.

mahindra and mahindra rules out increase in rbl stake
आरबीएल बँकेतील ३.५ टक्के हिस्सा महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने आठवडाभरापूर्वी खरेदी केला

बंगळुरू : आरबीएल बँकेतील ३.५ टक्के हिस्सा महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने आठवडाभरापूर्वी खरेदी केला असून, यापुढे बँकेतील हिस्सा आणखी वाढविणार नसल्याचे कंपनीने शुक्रवारी स्पष्ट केले.

महिंद्रने खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या ‘आरबीएल’मधील हिस्सा ४१७ कोटी रुपयांना विकत घेण्याची घोषणा केली होती. कंपनीच्या या निर्णयाबद्दल गुंतवणूकदारांनी नापसंती दर्शविली आणि त्या परिणामी समभागात ६ टक्क्यांची घसरणही दिसून आली. त्या समयी भविष्यात ‘आरबीएल’मध्ये ९.९ टक्क्यांपर्यंत हिस्सा वाढविण्याचे नियोजन असल्याचेही कंपनीने जाहीर केले होते.

Meeting RBI Monetary Policy Committee decision interest rates announced friday
व्याजदर बदलण्याची शक्यता शून्यच! रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक सुरू; शुक्रवारी निर्णय
Evergrande
विश्लेषण : चीनचे दोलायमान गृहनिर्माण क्षेत्र जगाला आर्थिक अडचणीत आणणार का? ‘एव्हरग्रांद’ प्रकरण काय आहे?
Bima-Sugam-online-portal-how-to-work
Bima Sugam : विमा क्षेत्रात क्रांती; विम्याचा हप्ता कमी होण्यासह ग्राहकांना कोणकोणते लाभ मिळणार?
Festive Season Retail Sector job
रिटेल क्षेत्रात भरपूर नोकऱ्यांची संधी; रिलायन्स रिटेल, ट्रेंट, टायटन यांसारख्या कंपन्या देणार रोजगार

मात्र शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत महिंद्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिश शहा भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की, आम्ही बँकिंग व्यवसाय जाणून घेण्याच्या उद्देशाने पुढील सात ते दहा वर्षांचा विचार करून ही गुंतवणूक केली आहे. भविष्यात त्यातून काही अर्थपूर्ण गोष्टी समोर आल्या नाहीत तर आमची गुंतवणूक ३.५ टक्क्यांवरच सीमित राहील. आज तरी ही गुंतवणूक वाढविण्याचा विचार नाही. या खासगी बँकेच्या संचालक मंडळात जागा मिळवण्याचा आमचा हेतू नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

भारतीय बँकिंग नियमन कायद्यानुसार बड्या उद्योग समूहांना बँकिंग क्षेत्रात मोठी गुंतवणूक करता येत नाही. एखाद्या बँकेतील १० टक्क्यांपेक्षा अधिक हिस्सा खरेदी करावयाचा असेल तर गुंतवणूकदाराला रिझर्व्ह बँकेची परवानगी आवश्यक असते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mahindra and mahindra rules out further increase stake in rbl print eco news zws

First published on: 04-08-2023 at 20:33 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×