लोकसभा निवडणूक निकालाच्या एक दिवस आधीच शेअर बाजारामध्ये रेकॉर्डब्रेक तेजी दिसतेय. आजच्या ट्रेंडिग सत्रात सेन्सेक्स २७७७ पॉइंटच्या तेजीसह निर्देशांक ७६ हजार ७३८ पर्यंत पोहोचला. पहिल्यादांचा सेन्सेक्सने ७६ हजारांचा टप्पा पार केलाय. तर, आज सेन्सेक्स २५०७ अंकावर बाजार बंद झाला. तर निफ्टी ७३३ अंकांनी उंचावून २३ हजार २६३ च्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्सच्या ३० शेअरपैकी २५ मध्ये तेजी आणि ५ मध्ये घट पाहायला मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुक्रवारी (दि. १ जून) एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाल्यानंतर आज सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळली. जवळपास सर्वच एक्झिट पोल्सनी एनडीएच्या बाजूने बहुमत असेल, असे अंदाज वर्तविले होते. या अंदाजानंतर परदेशी गुंतवणूकदार पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजाराकडे वळल्याचे चित्र दिसत आहे. शेअर बाजाराने एकदमच उसळी घेतल्याने गुंतवणूकधारकांचा आज १२ लाख कोटींची नफा झाला आहे. बीएसई मार्केट कॅप शुक्रवारी ४,१२,१२,८८१ कोटी रुपये होता. त्याची किंमत आज ४,२३,७१,२३३ कोटी रुपये झाली आहे.

NSE निफ्टी ५० ३.४५ टक्क्यांनी वाढून २३ हजार ३०७.३५ वर बंद झाला, तर BSE सेन्सेक्स ३.५५ टक्क्यांनी वाढून ७६ हजार ५८६.५० वर बंद झाला. बँक ऑफ बडोदा , स्टेट बँक ऑफ इंडिया , पंजाब नॅशनल बँक , ॲक्सिस बँक , इंडसइंड बँक आणि आयसीआयसीआय बँक यांच्या आघाडीवर असलेल्या बँक निफ्टी निर्देशांकाने ५१ हजार १०६.१५ हा सर्वकालीन उच्चांक गाठला.

बातमी अपडेट होत आहे

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Market ends at record high on exit polls clues nifty above 23250 sensex near 76500 sgk
Show comments