किरकोळ गुंतवणूकदारांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी म्युच्युअल फंड इंडस्ट्रीकडून नव-नवे प्रोडक्ट आणि सुविधा दिल्या जात असतात. यामुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. छोट्या बचतीतून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी डेली एसआयपी (डेली सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) हा एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. या सुविधेमध्ये गुंतवणूकदारांना दररोज त्यांच्या आवडीच्या योजनेत गुंतवणूक करण्याची संधी मिळते. विशेष म्हणजे याद्वारे दररोज किमान १०० रुपयांची गुंतवणूक करता येते. डेली एसआयपी गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या खर्चाची सरासरी काढण्यात आणि त्यांच्या गुंतवणुकीवरील बाजारातील अस्थिरतेचा प्रभाव कमी करण्यात मदत करतात.

डेली एसआयपीबाबत तज्ज्ञांचे काय मत आहे?


आयडीबीआय एएमसीचे हेड (प्रोडक्ट अँड मार्केटिंग) यांच्या मते, डेली एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना त्यांच्या आवडीच्या म्युच्युअल फंड योजनेत दररोज ठरावीक रक्कम गुंतवण्याची संधी मिळते. एक गुंतवणूकदार डेली एसआयपीमध्ये दररोज किमान १०० रुपये गुंतवू शकतो. यात एका निश्चित कालावधीसाठी चांगला फंड तयार होईल, ज्या गुंतवणूकदारांकडे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी एकहाती रक्कम नाही, त्यांच्यासाठी डेली एसआयपी एक चांगला पर्याय आहे. याशिवाय ज्या गुंतवणूकदारांना एका वेळी मोठी रक्कम गुंतवून आर्थिक धोका टाळायचा आहे आणि ठरावीक कालावधीत पद्धतशीरपणे गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी देखील हा चांगला पर्याय आहे.

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Loksatta explained What are the reasons for the fall of the rupee against the dollar and what are its consequences
गेल्या १० वर्षांत २८.३ टक्के घसरण… डॉलरपुढे रुपयाची घसरण आणखी कुठपर्यंत? कारणे काय? परिणाम काय?
dhule police corruption marathi news
दोन लाख रुपये देत असेल तर हद्दपारी रद्द…धुळ्यात पोलिसांची गुन्हेगाराकडेच पैशांची मागणी
public sector enterprises disinvestment in fy 24
निर्गुंतवणूक लक्ष्याची सरकारला पुन्हा हुलकावणी! सरकारी मालकीच्या कंपन्यांमधील हिस्सा विक्रीतून १६,५०७ कोटींचा लाभ

पेन्शनर्सना मोठा दिलासा! सरकारनं पेन्शनचा पर्याय निवडण्याची मुदत वाढवली

डेली एसआयपीतील गुंतवणुकीचे ७ जबरदस्त फायदे

तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांना डेली एसआयपीचे सात जबरदस्त फायदे मिळतात. रोज तुम्हाला गुंतवणुकीची सवय लावायची असेल किंवा कम्पाउंडिंग व्याजाचा फायदा घ्यायचा असेल, तर डेली एसआयपी एक चांगला पर्याय आहे. पण म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीची उद्दिष्ट्ये आणि जोखीम जाणून घेतली पाहिजे.

१) गुंतवणुकीची रक्कम निश्चित करण्याची सुविधा

डेली एसआयपीमध्ये किती रक्कम गुंतवायची आहे, याचे स्वतंत्र्य मिळते. तुम्ही रोज एक छोटी रक्कम गुंतवू शकता. पण कमीत कमी १०० रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

२) सरासरी खर्चात मदत

डेली एसआयपी गुंतवणूकदारांना ठराविक कालावधीत गुंतवणुकीच्या खर्चाची सरासरी काढण्यास मदत मिळते. याचा अर्थ गुंतवणूकदार हाय आणि लो दोन्ही मार्केट कंडिशनचा फायदा घेऊ शकतात.

३) गुंतवणुकीला शिस्त

डेली एसआयपीमुळे गुंतवणूकदारांमध्ये गुंतवणुकीची एक शिस्त निर्माण होते. कारण गुंतवणूकदारांना दररोज एक ठराविक रक्कम गुंतवावी लागते. यामुळे गुंतवणूकदारांना आवेगावर निर्णय घेण्यापासून संरक्षण करते.

४) लॉक-इनसाठी कोणताही कालावधी नाही


डेली एसआयपीमध्ये कोणताही लॉक-इन कालावधी नाही. मार्केटमधील चढ-उतारांचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूकदारांना किमान ६ महिने ते १ वर्षाच्या कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो.

५) ऑटोमॅटिक गुंतवणुकीचे ऑप्शन

डेली एसआयपीमध्ये ऑटोमॅटिक गुंतवणुकीचे ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गुंतवणूकदार त्यांच्या बँकेतून गुंतवणुकीची रक्कम ऑटोमॅटिक डेबिट होण्यासाठी ईसीएस (इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस) अनिवार्य करू शकतो.

६) पावर ऑफ कम्पाउंडिंगचा फायदा

डेसी एसआयपीमुळे गुंतवणूकदारांना कम्पाउंडिंग पावरचा लाभ घेता येतो. याचा अर्थ असा की, गुंतवणुकीवर मिळालेला परतावा कालांतराने जास्त परतावा निर्माण करण्यासाठी पुन्हा गुंतवता येतो.

७) फेरबदलाचा फायदा

डेली एसआयपी गुंतवणूकदारांना विविध म्युच्युअल फंड स्किम्स आणि एसेट क्लासमध्ये त्यांच्या गुंतवणुकीत विविधता आणण्याची संधी मिळते. यामुळे पोर्टफोलिओची जोखीम कमी करण्यात आणि जास्तीत जास्त परतावा मिळविण्यात मदत होते.