मुंबई : म्युच्युअल फंड हा गुंतवणूक पर्याय सर्वतोमुखी करणाऱ्या नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या अर्थात ‘एसआयपी’ पद्धतीची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढतच असल्याने वर्ष २०२२ मध्ये म्युच्युअल फंडातील गंगाजळीमध्ये २.२ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे.

म्युच्युअल फंड उद्योगाच्या एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्तेस (एयूएम) सरलेल्या वर्षांत ५.७ टक्क्यांची वाढ होत ती २०२२ साल सरताना एकूण ३९.८८ लाख कोटी रुपयांवर पोहोचली, अशी माहिती म्युच्युअल फंडाची शिखर संस्था असलेल्या ‘अ‍ॅम्फी’ने मंगळवारी दिली. मात्र त्याआधीच्या वर्षांत म्हणजेच २०२१ मधील भांडवली बाजारातील दमदार तेजीचे सकारात्मक प्रतििबब म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतही उमटल्याने त्या वर्षांत ७ लाख कोटींची भर पडली होती. त्या तुलनेत सरलेल्या वर्षांतील वाढ फारशी उत्साहवर्धक नाही. वर्ष २०२१ मध्ये फंड गंगाजळीमध्ये वार्षिक २२ टक्क्यांची वाढ होऊन, ती ३७.७२ लाख कोटींवर पोहोचली होती.

mutual fund, market, investment, Assets, small cap
स्मॉल कॅप फंडांमधील मालमत्ता २.४३ लाख कोटींवर
Equity mutual fund inflows eased in March
मार्चमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांतील ओघ आटला
Sonam Wangchuk
लेख: लडाखवासींची लोककेंद्री विकासासाठी हाक
india second highest gst collection at 1 78 lakh crore in march
मार्चमध्ये दुसरे सर्वाधिक १.७८ लाख कोटींचे जीएसटी संकलन; आर्थिक वर्षात एकूण संकलन उद्दिष्टापेक्षा सरस २०.१८ लाख कोटींवर

भांडवली बाजारातील अनिश्चितता आणि बदलत्या व्याजदर परिस्थितीमुळे व्यवसायावर परिणाम होत असल्याने, २०२२ मध्ये उद्योगाची वाढ संथ गतीने झाली. प्रतिकूल बाजार स्थितीमुळे बऱ्याच गुंतवणूकदारांना समभागसंलग्न म्युच्युअल फंड, रोखे आणि हायब्रिड फंडामधील गुंतवणुकीचा आढावा घेऊन फेर-गुंतवणूक करावी लागली. त्याउलट २०२१ मधील भांडवली बाजारातील तेजी म्युच्युअल फंड उद्योगाच्या वाढीस कारणीभूत ठरली.

सरलेल्या २०२२ मध्ये सरलेल्या नोव्हेंबरमध्ये नियोजनबद्ध गुंतवणुकीचा पर्याय असलेल्या ‘एसआयपी’च्या माध्यमातून विक्रमी १३,००० कोटींची मासिक गुंतवणूक आल्याचे आढळून आले. किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंडाबाबत जागरूकता निर्माण करण्याची ‘अ‍ॅम्फी’ने महत्त्वाची भूमिका बजावली. सरलेल्या वर्षांत, ‘एसआयपी’च्या माध्यमातून होणारी दरमहा गुंतवणूक सरासरी १२,५०० कोटींहून अधिक राहिली आहे.

म्युच्युअल फंडांमध्ये एकूण निव्वळ प्रवाह २०२२ मध्ये, ७१,४४३ कोटी रुपये होता. समभागसंलग्न योजनांमध्ये सर्वाधिक १.६१ लाख कोटी रुपये, इंडेक्स फंड आणि ईटीएफमध्ये १.६५ लाख कोटी रुपयांचा ओघ आला. तर रोखे योजनांमधून २.५ लाख कोटींचा निधी काढून घेण्यात आला. गुंतवणूकदारांची संख्या वर्षभरात दोन कोटींनी वाढून १४.११ कोटींवर पोहोचल्याचा अंदाज आहे.

समभाग आणि समभागसंलग्न अर्थात इक्विटी योजनांविषयी वाढती जागरूकता आणि दीर्घकालीन संपत्तीनिर्माणाची त्यांची क्षमता यामुळेच २०२२ मध्ये या योजनांमधील प्रवाहात सर्वाधिक वाढ झाली. हा सातत्यपूर्ण प्रवाह किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या जागरूकतेचे प्रतीक आहे. २०२२ साल अस्थिर राहिल्याने बाजारातील चढ-उतारांचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक कायम ठेवल्याचे निदर्शनास आले.

– राधिका गुप्ता, व्यवस्थापकीय संचालक, एडेल्वाईज म्युच्युअल फंड