scorecardresearch

Premium

माझा पोर्टफोलियो : मिड आणि स्मॉलकॅपमध्ये चांगलीच तेजी, पोर्टफोलियोचा तिसरा त्रैमासिक आढावा – २०२३

घसरता रुपया, चलनवाढ आणि जागतिक बाजारातील वाढती अनिश्चितता या पार्श्वभूमीवर हे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आल्याने गुंतवणूकदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

my portfolio, mid and small cap fund, third quarter portfolio review, financial year 2023
माझा पोर्टफोलियो : मिड आणि स्मॉलकॅपमध्ये चांगलीच तेजी, पोर्टफोलियोचा तिसरा त्रैमासिक आढावा – २०२३ (संग्रहित छायाचित्र)

विद्यमान २०२३ या नवीन कॅलेंडर वर्षाला आज नऊ महीने पूर्ण झाले. तर २०२३ या आर्थिक वर्षाचा हा दुसऱ्या तिमाहीचा आढावा आहे. बहुतांश कंपन्यांनी आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. घसरता रुपया, चलनवाढ आणि जागतिक बाजारातील वाढती अनिश्चितता या पार्श्वभूमीवर हे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आल्याने गुंतवणूकदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गेल्या दोन महिन्यांत व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांनी चांगलीच तेजी दाखवली असून सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी उच्चांकी पातळीला गवसणी घातली. १५ सप्टेंबरला मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्सने ६७,८३८.६३ आणि निफ्टीने २०,१९२.३५ ही ऐतिहासिक सर्वोच्च पातळी गाठली.

मात्र त्यानंतर गेले दोन आठवडे भांडवली बाजारात समभाग विक्रीचा जोर वाढला आणि सेन्सेक्स ६५,८२८ तर निफ्टी १९,६३८ पर्यंत खाली घसरला. जागतिक बाजारातील खनिज तेलाच्या किमतीत होत असलेली वाढ चिंताजनक असून त्याचा परिणाम पुन्हा चलनवाढीत होईल. यशस्वी जी -२० परिषदेच्या पश्चात कॅनडा बरोबरचे गढूळ झालेले संबंध तसेच अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने दिलेले व्याजदर वाढीचे स्पष्ट संकेत आणि निवडणुकीचे वाजू लागलेले पडघम या सर्व कारणांमुळे आगामी कालावधीत बाजार अस्थिर राहील असे वाटते. मात्र याच काळात सोन्या-चांदीचे भाव चढेच राहिले आहेत हे विशेष.

RBI, home loan, Shaktikanta Das, repo rate
सलग चौथ्यांदा व्याजदर अपरिवर्तित, रिझर्व्ह बँकेकडून अपेक्षेनुरूप ‘जैसे थे’ भूमिका
Lucky man got Rs 13 thousand 311 crores
याला म्हणतात नशीब! खरेदीसाठी सुपरमार्केटमध्ये गेला अन् क्षणात १३ हजार ३११ कोटींचा मालक झाला
nifty share market
Money Mantra: आठवड्याअखेरीस विक्रीचा जोर कायम, निफ्टी १९७०० खाली
High Blood Pressure Hypertension
बहुतांश भारतीय हायपरटेन्शनचे बळी; ‘या’ मोठ्या समस्येमुळे येतोय उपचारांमध्ये अडथळा; WHO चा धक्कादायक अहवाल

आपल्या पोर्टफोलिओची नऊ महिन्यांची प्रगती समाधानकारक आहे. या नऊ महिन्यात वेळोवेळी गुंतविलेले एकूण ४४,५२५ रुपये ३० सप्टेंबर अखेर ७,७१० रुपयांच्या नफ्यासह ५२,२३५ रुपये झाले आहेत. या कालावधीत १७.३१ टक्के परतावा मिळाला तर पोर्टफोलिओचा आयआरआर ४५.३० टक्के आहे. माझा पोर्टफोलियो अंतर्गत सुचवलेले समभाग हे नेहमीच मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी असल्याने त्यांचे लगेचच मूल्यमापन करणे योग्य ठरणार नाही. मात्र वाचक गुंतवणूकदारांनी कायम जागरूकता दाखवून गुंतवणूक केलेल्या कंपन्यांचे आर्थिक निकाल तसेच शेअरबाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: My portfolio mid and small cap third quarter portfolio review financial year 2023 print eco news css

First published on: 01-10-2023 at 11:29 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×