नवी दिल्ली : कृत्रिम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत हा जगाचे नेतृत्व करणार असून, तरूण स्वयंउद्योजक आणि नवउद्यमींनी जागतिक पातळीवरील आव्हाने सोडविण्यासाठी उपाय शोधावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले.

येथे आयोजित ‘स्टार्टअप महाकुंभ’मध्ये बोलताना मोदी म्हणाले, सध्या भारत कृत्रिम प्रज्ञा मोहीम, सेमीकंडक्टर मोहीम आणि राष्ट्रीय क्वांटम मोहीम या तीन मोहिमा सरकारने सुरू केल्या आहेत. त्यातून तरूणांसाठी रोजगार निर्माण होणार असून, जागतिक गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. आपण आता कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाच्या नव्या युगात आहोत. यात भारत आघाडी घेईल हे जगाने मान्य केले आहे. त्यामुळे ही संधी हातातून जाऊ न देणे याला आपणा सर्वांचे प्राधान्य असायला हवे.

modi third swearing ceremony
मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी ‘या’ राष्ट्रांच्या प्रमुखांना निमंत्रण, निमंत्रणांचे महत्त्व काय?
dr subhash chandra appeal all to stand against threats to press freedom
माध्यम स्वातंत्र्याच्या धोक्यांविरोधात एकजूट करण्याचे ‘झी’ समूहाचे सुभाष चंद्रा यांचे आवाहन 
agriculture not an issue in pm narendra Modi campaign
मोदींच्या प्रचारात यंदा शेतीचा मुद्दा का नव्हता? जाणून घ्या ‘कारण’
Chinas minister of national defence admiral dong jun
“तैवानला चीनपासून वेगळे करणाऱ्याचा आत्मनाश होईल”, चीनच्या संरक्षणमंत्र्यांचा थेट इशारा
Prime Minister Narendra Modi hat trick prediction in post poll tests
भाजप आघाडी ३५० पार; मतदानोत्तर चाचण्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हॅट्ट्रिकचा अंदाज
PM Narendra Modi will Make The Record Like Pandit Nehru
Exit Poll Results 2024: नरेंद्र मोदी करणार पंडीत नेहरुंच्या ‘त्या’ विक्रमाशी बरोबरी, एक्झिट पोल्सचे ‘हे’ संकेत!
Putin, Putin news, Russia,
विश्लेषण : रशियात एकामागून एक लष्करी सेनापतींना पुतिन बडतर्फ का करत आहेत? भ्रष्टाचाराबद्दल की आणखी काही कारण?
Kartarpur Sahib gurdwara PM Modi statement to take Kartarpur Sahib back
“‘कर्तारपूर’ १९७१ मध्येच भारतात आला असता”; मोदींच्या दाव्यातील गुरुद्वाराचा काय आहे इतिहास?

हेही वाचा >>>बँक ऑफ इंडियाकडून घरांसाठी कर्ज स्वस्त, प्रक्रिया शुल्कही माफ; सवलतीतील ८.३ टक्के व्याजदराचा लाभ मात्र ३१ मार्चपर्यंतच!

कृत्रिम प्रज्ञेतून तरूण संशोधक आणि जागतिक गुंतवणूकदारांसाठी अमर्याद शक्यता निर्माण झाल्या आहेत. या क्षेत्रातील क्षमतांचे नेतृत्व भारताच्या हातात राहायला हवे. जागतिक पातळीवरील समस्यांसाठी भारतीय या क्षेत्राच्या माध्यमातून उपाय शोधतील, याबद्दल मला विश्वास आहे. जगातील अनेक देशांच्या समस्या भारतीय संशोधक आगामी काळात सोडवणार आहेत, असे मोदी यांनी सांगितले.

देशात २०१४ सालात नवउद्यमी उपक्रमांची संख्या शंभरही नव्हती, आज त्यांची संख्या १.२५ लाखांवर गेली आहे. तर १२ लाख युवक या उपक्रमांमध्ये थेट कार्यरत आहेत.  यातील ११० हून अधिक उपक्रम युनिकॉर्न श्रेणीतील असून, दाखल पेटंटची संख्या १२ हजारांहून अधिक आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

राष्ट्रीय संशोधन संस्था स्थापन करण्यात येणार असून, त्यासाठी हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. नवउद्यमी उपक्रमांना निधी उभारणीसाठी चांगली व्यवस्था निर्माण केली जाणार आहे.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान