scorecardresearch

Premium

BYJU’s च्या १००० कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबरचे पगार रखडले, कंपनीनं दिलं ‘हे’ कारण

मिंटच्या वृत्तानुसार, बायजू आपल्या सुमारे १ हजार कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचा पगार अद्याप देऊ शकलेले नाहीत. मात्र, पगाराला उशीर होण्यामागे अचानक झालेले तांत्रिक बिघाड हे कारण असल्याचे बायजू यांचे म्हणणे आहे.

Byjus Raveendran
Byju च्या १००० कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबरचे पगार रखडले, कंपनीनं दिलं 'हे' कारण (फोटो क्रेडिट- फायनान्शिअल एक्सप्रेस)

शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध स्टार्टअप कंपनी बायजू एकामागून एक नवीन समस्यांमध्ये अडकत चालली आहे. अनेक महिन्यांपासून वादात सापडलेली ही कंपनी आता आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना पगार देण्यास विलंब केल्यामुळे चर्चेत आली आहे. बायजूच्या सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर महिन्याचे पगार लांबले असून, ते अद्याप मिळाले नसल्याचे वृत्त आहे.

सोमवारपर्यंत पगार मिळू शकतो

मिंटच्या वृत्तानुसार, बायजू आपल्या सुमारे १ हजार कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचा पगार अद्याप देऊ शकलेले नाहीत. मात्र, पगाराला उशीर होण्यामागे अचानक झालेले तांत्रिक बिघाड हे कारण असल्याचे बायजू यांचे म्हणणे आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, ते समस्येचे निराकरण करण्यासाठी काम करीत आहेत. प्रभावित कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर महिन्याचे पगार सोमवार ४ डिसेंबरपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होतील, असंही बायजूकडून सांगितलं जात आहे.

PM Narendra Modi
”नव्या सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलासाठी ८०० कोटी मंजूर”, मोदी म्हणाले, ”नवीन संसद भवनाप्रमाणे…”
Bank Holiday in February 2024
Bank Holiday in February 2024 : फेब्रुवारीत बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या, किती दिवस बँका राहणार बंद?
nagpur mahavitaran marathi news, 2 outsourced employees beaten up marathi news
ऊर्जामंत्र्यांच्या शहरात महावितरणच्या दोन बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांची एकाला मारहाण…
Maratha survey Buldhana district
मराठा सर्वेक्षण ठरतंय अडथळ्याची शर्यत! आठवड्यात साडेसहा लाख घरांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान; आयोगाच्या सदस्या बुलढाण्यात मुक्कामी

हेही वाचाः LPG Price Hike: काल मतदान संपलं, आज गॅस सिलिंडरची भाववाढ! मुंबईसह विविध शहरांमधील नवे दर जाणून घ्या

पॅरंट कंपनीचे कर्मचारी प्रभावित

रिपोर्ट्सनुसार, ज्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर परिणाम झाला आहे ते मूळ कंपनी थिंक अँड लर्नचे आहेत. यावेळी जवळपास सर्वच युनिटमधील कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. उपकंपनी आकाश संस्थेतील कर्मचाऱ्यांची परिस्थिती सामान्य असून, त्यांच्या पगारात कोणताही विलंब नाही.

हेही वाचाः ‘गो फर्स्ट’चे सीईओ कौशिक खोना यांचा राजीनामा, कर्मचाऱ्यांसाठी भावनिक संदेश लिहित झाले पायउतार

याप्रकरणी ईडीकडून नोटीस प्राप्त

बायजूची ही समस्या अशा वेळी आली आहे जेव्हा कंपनी आधीच अनेक वादांना तोंड देत आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीने FEMA तरतुदींचे उल्लंघन केल्याच्या बातम्या आल्या होत्या. सुमारे ८००० कोटी रुपयांच्या विदेशी गुंतवणुकीची कागदपत्रे देण्यास कंपनीने उशीर केल्याचे ईडीने म्हटले होते. कंपनीला त्या बदल्यात शेअर्सचे वाटपही करता आलेले नाही. याबाबत ईडीने कंपनीला नोटीस पाठवली आहे.

बीसीसीआयशीही वाद

कंपनीचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशीही वाद सुरू आहे. ब्लूमबर्गने एका अहवालात म्हटले होते की, बायजूने प्रायोजकत्वाशी संबंधित सुमारे २० दशलक्ष डॉलरची रॉयल्टी चुकवली आहे. हे प्रकरण एनसीएलटीकडे गेले असून, २२ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. कंपनीने १.२ बिलियन डॉलरच्या मुदत कर्जावरील व्याज भरण्यातही चूक केली आहे आणि त्याबाबतही वाद सुरू आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: November salaries of byjus 1000 employees withheld company gives this reason vrd

First published on: 04-12-2023 at 10:46 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×