नवी दिल्ली : भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रात पुढील तीन ते पाच वर्षांत ९५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणे अपेक्षित आहे. ही गुंतवणूक ‘पीएम मित्र मेगा टेक्स्टाईल पार्क’ आणि उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन (पीएलआय) योजना यामुळे होईल, असा दावा केंद्रीय वस्त्रोद्योग सचिव रचना शहा यांनी सोमवारी येथे केला.

हेही वाचा >>> Adar Poonawalla Net Worth : करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये अदर पूनावालांची हजार कोटींची गुंतवणूक, एकूण किती संपत्तीचे आहेत मालक?

मानवनिर्मित कापड, कपडे आणि वस्त्रोद्योग हे उदयोन्मुख क्षेत्र असून, त्यासाठी सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती शहा यांनी दिली. शहा म्हणाल्या की, पीएम मित्र मेगा टेक्स्टाइल पार्क आणि पीएलआय योजनेसोबतच थेट परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातून वस्त्रोद्योग क्षेत्रात गुंतवणूक होईल. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात ‘भारत टेक्स २०२५’ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यातून अनेक सकारात्मक गोष्टी घडतील. या कार्यक्रमात केवळ परस्पर सामंजस्य करार होणार नसून, गुंतवणूक आणि व्यवसाय वृद्धीची संधीही उपलब्ध होईल.

हेही वाचा >>> Adar Poonawalla : अदर पूनावाला आता चित्रपट निर्मितीत, करण जोहरच्या ‘धर्मा’बरोबर मोठं डील! कोण असेल सीईओ?

सरकारने सात टेक्स्टाइल पार्क प्रस्तावित केले असून, त्यातील प्रत्येकात १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. यातून एकूण ७० हजार रुपयांची गुंतवणूक होईल आणि पीएलआय योजनेच्या माध्यमातून आणखी २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. सध्या यातील काही गुंतवणूक सुरू झाली असून, पुढील ३ ते ५ वर्षांत गुंतवणुकीचा ओघ सुरू राहील. याचबरोबर थेट परकीय गुंतवणूक आणि इतर मार्गानेही गुंतवणूक होईल, असे शहा यांनी सांगितले.

पीएम मित्र मेगा टेक्स्टाइल पार्क कुठे?

अमरावती (महाराष्ट्र)

– विरुद्धनगर (तमिळनाडू)

– वारंगल (तेलंगण)

– नवसारी (गुजरात)

– कलबुर्गी (कर्नाटक)

– धार (मध्य प्रदेश)

– लखनऊ/हरदोई (उत्तर प्रदेश)

Story img Loader