पुणे : अत्यंत गजबजलेल्या आणि विकसनशील पुण्यातील विमाननगर परिसरात पीएनजी ज्वेलर्सने आपले ‘लाइटस्टाईल बाय पीएनजी’ या नवीन स्वतंत्र दालनाचे नुकतेच उद्घाटन केले. पुण्यातील लाइटस्टाईलचे हे चौथे आणि तर देशातील पाचवे दालन असून, त्यातून पीएनजी ज्वेलर्सच्या दालनांची एकूण संख्या ६६ झाली आहे. विमाननगर येथील आयडियल लँडमार्क कॉम्प्लेक्समधील ६०० चौ. फूट क्षेत्रफळ असलेल्या दालनाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या हस्ते करण्यात आले.
हलकी, स्टायलिश आणि ठळक डिझाईन असलेल्या दागिन्यांची पसंती असलेल्या आजच्या फॅशनप्रेमी ग्राहकांसाठी ‘लाइटस्टाइल’ ही खास नाममुद्रा आहे. नवीन दालनात १४ कॅरेट, १८ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्यातील दागिन्यांसह १८ कॅरेट डायमंड ज्वेलरीचा विस्तृत संग्रह उपलब्ध आहे. समकालीन डिझाईन, परवडणारी किंमत आणि प्रीमियम रिटेल अनुभव यांवर लक्ष केंद्रित करत, लाइटस्टाईल ब्रँड शहरी ग्राहकांमध्ये आपली वेगळी ओळख अधिक मजबूत करत आहे.
६०० चौ. फूट क्षेत्रफळ असलेले हे विमाननगर मधील दालन पुण्यातील लाइटस्टाईलचे चौथे तर एकूण भारतभर पाचवे स्टोअर असून, यामुळे पीएनजी ज्वेलर्सच्या विविध फॉरमॅट्समधील स्टोअर्सची एकूण संख्या ६६ वर पोहोचली आहे. या स्टोअरचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणाल्या, “आजच्या महिलांचा आत्मविश्वास, बहुआयामी व्यक्तिमत्त्व आणि सहजतेने वापरता येणारी स्टायलिश ज्वेलरी लाइटस्टाईलच्या डिझाईन्समधून सुंदररीत्या दिसून येते. हे दागिने रोजच्या वापरासाठी आणि आजच्या महिलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी परिपूर्ण आहेत.”
यावेळी बोलताना लाइटस्टाईलचे हेड-मार्केटिंग, ई-कॉमर्स, सीआरएम आणि सीएसआर, हेमंत चव्हाण म्हणाले, “विमाननगरमध्ये तरुण, शहरी ग्राहकवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे, जे हलक्या दागिन्यांकडे अधिक आकर्षित होत आहे. हा नवीन रिटेल टचपॉईंट आम्हाला या ग्राहकांशी अधिक जोडण्यास मदत करेल.”
लाइटस्टाईलच्या विस्तार योजनांबाबत बोलताना पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले, “ग्राहकांच्या बदलत्या आवडी लक्षात घेऊन हलक्या आणि फाइन ज्वेलरीमध्ये नावीन्य आणणे ही लाइटस्टाईलची संकल्पना आहे, यासोबतच पीएनजी ज्वेलर्सची विश्वासार्हता व कारागिरी कायम राखण्याचा प्रयत्न करेल.”
सुलभ लक्झरी या तत्त्वाशी प्रामाणिक राहून, लाइटस्टाईल रोजच्या वापरासाठी उपयुक्त आणि आधुनिक सौंदर्यशैलीचे दागिने सादर करत आहे. स्टोअरच्या उद्घाटनानिमित्त, ४ जानेवारी २०२६ पर्यंत लाइटस्टाईलच्या सर्व दागिन्यांवरील मेकिंग चार्जेसवर ग्राहकांना ५० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे.
