एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड (बीएसई कोड ५४४२८९)
वेबसाइट: https://ngel.in/ngel-home
प्रवर्तक: एनटीपीसी लिमिटेड
बाजारभाव: रु. ९७/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: हरित ऊर्जा
भरणा झालेले भाग भांडवल: रु. ८,३२६.३३ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ८९.०१
परदेशी गुंतवणूकदार १.९८
बँक/ म्यु. फंड/ सरकार ४.८७
इतर/ जनता ४.१४
पुस्तकी मूल्य: रु.२१.६
दर्शनी मूल्य: रु. १०/-
लाभांश: ००%
प्रति समभाग उत्पन्न: रु. ०.४
किंमत उत्पन्न गुणोत्तर: २३८
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २९
डेट इक्विटी गुणोत्तर: २.२२
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: १.७
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड (ROCE): ७.६०
बीटा : १.६
बाजार भांडवल: रु. ८२,१७३ कोटी (लार्ज कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: १५५/८५
गुंतवणूक कालावधी: ३६ महिने
एप्रिल २०२२ मध्ये स्थापन झालेली, एनटीपीसी ग्रीन एनर्जी ही सार्वजनिक क्षेत्रातील एनटीपीसी लिमिटेडची एक उपकंपनी आहे, जी अक्षय्य ऊर्जा प्रकल्पांच्या विकासावर लक्ष केंद्रित करते. विशेषतः सौर, पवन आणि हरित हायड्रोजन यासारख्या पर्यावरणपूरक ऊर्जेच्या स्रोतांवर तसेच सेंद्रिय आणि अजैविक मार्गांनी प्रकल्प हाती घेण्यावर कंपनी लक्ष केंद्रित करते.
प्रकल्प/ उत्पादन पोर्टफोलिओ
एकूण अक्षय्य ऊर्जा क्षमता: २६,०७१ मेगावॉट
कार्यरत: ३,३२० मेगावॉट (३,२२० मेगावॉट सौर, १०० मेगावॉट पवन).
करार/पुरस्कृत: १३,५७६ मेगावॉट (१०,५७६ मेगावॉट सौर, ३,००० मेगावॉट पवन).
निर्माणाधीन: ९,१७५ मेगावॉट (६,९२५ मेगावॉट सौर, २,२५० मेगावॉट पवन).
कंपनीचे केंद्र आणि राज्य सरकारी संस्था आणि सार्वजनिक उपयोगितांसह १७ करार झाले आहेत, जे २५ वर्षांच्या वीज खरेदी सामंजस्याद्वारे स्थिर, दीर्घकालीन रोख प्रवाह सुनिश्चित करतात.
महसूल विभाजनः (आर्थिक वर्ष २०२४)
सौर ऊर्जा विक्री – ९१%
पवन ऊर्जा विक्री – ४.५%
इतर – ४.५ %
कंपनीचे तिची उपकंपनी एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जीसह, भारतातील सहा राज्यांमध्ये पवन तसेच सौर प्रकल्प कार्यरत आहेत, ज्यामध्ये राजस्थानने एकूण क्षमतेच्या ६२.२ टक्के योगदान दिले आहे. कंपनीचे १८ सौर ऊर्जा प्रकल्प, तर गुजरातेत दोन पवन ऊर्जा प्रकल्प आहेत. कंपनी लवकरच हयड्रोजन ऊर्जा प्रकल्प हातात घेईल. कंपनीचा १५० मेगावॉटचा गुजरात पीव्ही सोलर प्रकल्प नुकताच कार्यान्वयित झाला आहे.
संयुक्त उपक्रमः
१. एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड (एनआरईएल)
एनआरईएल ही एनटीपीसी ग्रीन एनर्जीची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. एनजीईएलच्या पोर्टफोलिओअंतर्गत अक्षय्य ऊर्जा प्रकल्पांमध्ये ती महत्त्वाची भूमिका बजावते.
२. ग्रीन व्हॅली रिन्यूएबल एनर्जी
- मालकी: ५१% एनजीईएलची आणि ४९% दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनची
- भूमिका: अक्षय्य ऊर्जा प्रकल्पांच्या विकासात सहभागी आहे. संयुक्त उपक्रमाची रचना दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनच्या पायाभूत सुविधा आणि बाजारपेठेतील उपस्थितीचा फायदा घेण्यास मदत करते.
३. इंडियन ऑइल एनटीपीसी ग्रीन एनर्जी
- मालकी: ५०% एनजीईएलची आणि ५०% इंडियन ऑइलची
- भूमिका: हा संयुक्त उपक्रम अक्षय्य ऊर्जा विकासावर लक्ष केंद्रित करतो, विशेषतः अक्षय्य ऊर्जा आणि हायड्रोजन उत्पादन यासारख्या हरित ऊर्जा प्रकल्पांमध्ये.
धोरणात्मक उपक्रम
- कंपनी ग्रीन हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स आणि बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीमवर लक्ष केंद्रित करत आहे.
- चालू प्रकल्पांमध्ये पुडीमडका येथे ग्रीन हायड्रोजन हबची स्थापना आणि ग्रिड-स्केल बॅटरी स्टोरेज सोल्यूशन्सचा समावेश आहे.
गेल्याच वर्षात कंपनीने प्रति शेअर १०८ रुपये दराने, ‘आयपीओ’द्वारे १०,००० कोटी रुपये उभारले होते. या निधीचा वापर मुख्यत्वे कर्जाची परतफेड करण्याकरिता केला जात आहे.
मार्च २०२४ अखेरपर्यंत कंपनीकडे ३,०१७ मेगावॉट सौर आणि १०० मेगावॉट पवन ऊर्जा प्रकल्प कार्यरत होते, आणि ११,७७१ मेगावॉट क्षमतेचे प्रकल्प विकासाधीन होते. भारत येत्या पाच वर्षात ५०० गिगावॉट अक्षय्य ऊर्जा क्षमता साध्य करण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहे. ज्यामुळे या क्षेत्रात मोठी वाढ अपेक्षित आहे. कंपनीला अदानी ग्रीन, रिन्यू पॉवर, टाटा पॉवर रिन्यूअल्स यासारख्या प्रतिस्पर्ध्यांकडून तगडी स्पर्धा अपेक्षित असली तरीही एनटीपीसीसारखी उत्तम प्रवर्तक आणि सरकारी पाठिंबा यामुळे एनटीपीसी ग्रीन एनर्जीची विश्वासाहर्ता वाढते.
डिसेंबर २०२४ साठी संपलेल्या तिमाहीत कंपनीने ५०५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ६६ कोटी रुपयांचा नक्त नफा कामावला होता, तर मार्च २०२४ साठी संपलेल्या म्हणजे गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने १,९६३ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३४५ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. कंपनीचे चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकाल अजून जाहीर व्हायचे आहेत. अर्थात पुढील पूर्ण वर्षाचे निकाल आणि सुरू होणारे प्रकल्प कंपनीची वाटचाल दाखवतील. कंपनी व्यवस्थापनाच्या अंदाजानुसार कार्यादेश (ऑर्डर बुक) वाढते राहून मूल्यांकन वाढण्यास मदत करेल तसेच कर्जफेडीला हातभार लावेल. सध्या १०० रुपयांच्या आत उपलब्ध असलेला हा शेअर एक प्रदीर्घ गुंतवणूक म्हणून पोर्टफोलियोत असायला हरकत नाही.
शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सध्याच्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
अजय वाळिंबे
Stocksandwealth@gmail.com
वरील लेख केवळ विश्लेषणात्मक संशोधन असून तो गुंतवणूक सल्ला नाही.
प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या ०.१% पेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.