पीटीआय, नवी दिल्ली
Aviation Turbine Fuel: विमानाचे इंधन म्हणून प्रचलित एव्हिएशन टर्बाइन फ्युएलमध्ये (एटीएफ) दर किलो लिटरमागे २,७७६.७८ रुपयांनी म्हणजेच ३.३ टक्क्यांची शुक्रवारी वाढ करण्यात आली. याबरोबरच वाणिज्य वापराच्या एलपीजीचे दर सिलिंडरमागे ६२ रुपयांनी वाढवण्यात आले.

ताज्या वाढीनंतर विमानाच्या इंधनाचे दर मुंबईमध्ये हे दर किलोलिटरला ८१,८६६.१३ रुपयांवरून ८४,६४२.९१ रुपयांपर्यंत, तर दिल्लीत आता हे दर किलोलिटरला ९०,५३८.७२ रुपये झाले असल्याचे सरकारी तेल कंपन्यांनी स्पष्ट केले. गेल्या महिन्यात दोनदा किंमत कमी झाल्याने विमान कंपन्यांचा भार हलका होण्यास मदत झाली होती. आता मात्र पुन्हा त्यात ३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. विमान कंपन्यांचा परिचालन खर्चाच्या जवळपास ४० टक्के खर्च इंधनावर होतो.

partha pratim Sengupta bandhan bank
Bandhan Bank: बंधन बँकेची सूत्रे पार्था प्रतिम सेनगुप्ता यांच्याकडे
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
New record of UPI transactions
UPI Transactions: यूपीआय व्यवहारांचा नवीन विक्रम; ऑक्टोबरमध्ये २३.५ लाख कोटी मूल्याचे १६.५८ अब्ज व्यवहार
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर

हेही वाचा :Bandhan Bank: बंधन बँकेची सूत्रे पार्था प्रतिम सेनगुप्ता यांच्याकडे

सोबतच, तेल कंपन्यांनी वाणिज्य एलपीजीच्या किमतीत ६२ रुपयांनी वाढ केल्याने १९ किलोग्रॅमच्या सिलिंडरची किंमत १,८०२ रुपये (दिल्ली) झाली आहे. ही सलग चौथी मासिक वाढ आहे. मुंबईत वाणिज्य एलपीजीची किंमत आता प्रति सिलिंडर १,७५४.५० रुपये आहे. गेल्या महिन्यात ४८.५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. दुसरीकडे मात्र घरगुती वापराच्या स्वयंपाकाच्या गॅसचा दर ८०३ रुपये प्रति सिलिंडरवर कायम आहे.

Story img Loader