नवो दिल्ली : सरकारी मालकीच्या बँकांचा एकूण नफा मार्च २०२४ अखेर सरलेल्या आर्थिक वर्षात १.४० लाख कोटी रुपयांहून अधिक वाढला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत त्यात ३५ टक्क्यांची भरघोस वाढ झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील १२ बँकांनी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये एकत्रित १,०४,६४९ कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता.

सरलेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०२३-२४ या वर्षात बँकांनी कमावलेल्या १,४१,२०३ कोटी नफ्यामध्ये सरकारी बँकांमधील सर्वात मोठी असलेल्या स्टेट बँकेचे ४० टक्क्यांहून अधिक योगदान आहे. स्टेट बँकेने ६१,०७७ कोटी रुपयांचा नफा नोंदवला. त्याआधीच्या वर्षात तो ५०,२३२ कोटी राहिला होता त्यात २२ टक्क्यांची वाढ झाली आहे.

fm nirmala sitharaman assessment of india progress in 10 years
‘बचतदार ते गुंतवणूकदार गतिमान संक्रमण स्वागतार्हच’; अर्थमंत्री सीतारामन यांच्याकडून १० वर्षातील प्रगतीचे गुणगाण
Narendra Modi
“मी मुस्लीम कुटुंबांत राहिलो, मला अनेक मुस्लीम मित्र, पण २००२ नंतर…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान चर्चेत
Arvind Kejriwal
Swati Maliwal Assualt Case : बिभव कुमार यांना अटक झाल्यानंतर अरविंद केजरीवालांचं मोदींना थेट आव्हान; म्हणाले, “उद्या दुपारी १२ वाजता…”
Agra Income tas raids
पलंग, पिशव्या अन् चपलांच्या बॉक्समध्येही ऐवज! IT च्या धाडीत सापडलं कोट्यवधींचं घबाड, अधिकारी रात्रभर पैसेच मोजत बसले!
j p nadda and vasant kane
जे. पी. नड्डांनी संघाबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर अभ्यासक वसंत काणेंची प्रतिक्रिया; म्हणाले “एवढा मोठा पक्ष…”
Former Pakistan Prime Minister Imran Khan Granted Bail
१० महिन्यांनी पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान इम्रान खान यांना बघून लोकांना बसला धक्का; पांढरे केस-दाढी आणि चेहऱ्यावर..
What percentage of voting was done in Baramati Constituency till three o clock
Loksabha Poll 2024 : तिसऱ्या टप्प्यात ६१.४५ टक्के नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क; सर्वाधिक मतदान आसाममध्ये, तर महाराष्ट्रात…
kanhaiya kumar slapped video
Video: कन्हैया कुमार यांच्यावर दिल्लीत हल्ला; हार घालण्याच्या बहाण्याने कानशिलात लगावली, उत्तर देताना म्हणाले, “ए साहब…”

टक्केवारीनुसार, दिल्लीस्थित पंजाब नॅशनल बँकेने सर्वाधिक २२८ टक्क्यांसह ८,२४५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला. त्यापाठोपाठ युनियन बँकेच्या नफ्यात ६२ टक्के वाढ होत तो १३,६४९ कोटी रुपये आणि सेंट्रल बँकेच्या नफ्यात ६१ टक्के वाढ झाली आणि तो २,५४९ कोटींवर पोहोचला आहे.

हेही वाचा >>> घाऊक महागाई एप्रिलमध्ये १.२६ टक्क्यांसह १३ महिन्यांच्या उच्चांकी

निव्वळ नफ्यात ५० टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवलेल्या बँकांमध्ये बँक ऑफ इंडियाचा समावेश असून तिचा नफा ५७ टक्क्यांनी वाढून ६,३१८ कोटी रुपये झाला. तर पुण्यात मुख्यालय असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने ५६ टक्के वाढ नोंदवल ४,०५५ कोटी रुपये आणि चेन्नईस्थित इंडिया बँकेने ५३ टक्के वाढ नोंदवत ८,०६३ कोटी रुपयांची कमाई केली.

सार्वजनिक क्षेत्रातील, १२ बँकांपैकी फक्त पंजाब आणि सिंध बँकेच्या नफ्यात घट झाली आहे. दिल्लीत मुख्यालय असलेल्या पंजाब अँड सिंध बँकेच्या वार्षिक निव्वळ नफ्यात ५५ टक्के घट नोंदवली गेली, २०२-२३ मधील १,३१३ कोटी रुपयांवरून मार्च २०२४ अखेर सरलेल्या आर्थिक वर्षात निव्वळ नफा ५९५ कोटी रुपयांपर्यंत खाली घसरला. वर्षभरात १०,००० कोटींपेक्षा जास्त नफा कमवणाऱ्या बँकांमध्ये बँक ऑफ बडोदा (१७,७८८ कोटी रुपये) आणि कॅनरा बँकेचा (१४,५५४ कोटी) समावेश आहे.

हेही वाचा >>> Stock Market Update : महागाई नरमल्याने निर्देशांकांना बळ; सेन्सेक्सची तीन शतकी चाल

सर्वसमावेशक ‘४ आरएस’ धोरण सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे आर्थिक आरोग्य सुधारण्यासाठी, केंद्र सरकारने सर्वसमावेशक ‘४ आरएस’ धोरण अमलात आणले आहे. यामध्ये एनपीए खात्याची ओळख, निराकरण, आणि वसुलीसाठी प्रयत्न, बँकांचे पुनर्भाडवलीकरण या गोष्टींचा समावेश आहे. आर्थिक वर्ष २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षांमध्ये बँकांच्या पुनर्भाडवलीकरण करण्यासाठी ३,१०,९९७ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. वाणिज्य बँकांनी गेल्या आठ वर्षांमध्ये एनपीए निराकरणाच्या माध्यमातून ८,६०,३६९ कोटी रुपयांची वसुली केली. शिवाय वर्ष २०१८ मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना ८५,३९० कोटी रुपयांचा तोटा झाला होता.