पुणे: पुणेस्थित इंडिकस सॉफ्टवेअर कंपनीने जपानमधील सेको सोल्यूशन्सशी भागीदारी केली आहे. मोटारींसाठी अत्याधुनिक संपर्क यंत्रणा बनविण्यासाठी या दोन्ही कंपन्या एकत्र आल्या आहेत. सेको सोल्यूशन्सचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जून सेकिन आणि इंडिकसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा व्यापारी यांनी बुधवारी या भागीदारीची घोषणा केली.

हेही वाचा >>> निर्देशांक ऐतिहासिक उच्चांकांपासून अवघा अर्धा टक्का दूर; ‘फेड-कपात’ आशावादाने प्रेरित तेजी सलग आठव्या सत्रात 

income tax act review
प्राप्तिकर कायद्याच्या पुनरावलोकनासाठी सूचना-हरकती दाखल करण्याचे आवाहन
Toyota project Aurangabad marathi news
‘टोयोटा-किर्लोस्कर’चा छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रकल्प, २१ हजार कोटींची गुंतवणूक;…
India UAE food corridor marathi news
भारत-यूएई २०० कोटी डॉलरच्या गुंतवणुकीतून ‘फूड कॉरिडॉर’ उभारणार – पीयूष गोयल
40000 crores investment china marathi news
चिनी अर्थव्यवस्थेची उभारी भारताच्या शेअर बाजाराच्या मूळावर; सलग सहा सत्रातील घसरणीत ४०,००० कोटींच्या गुंतवणुकीचे चीनकडे वळण
rbi monetary policy news in marathi
जागतिक वस्तू दर पाहूनच व्याजदर कपात, रिझर्व्ह बँकेकडून यंदाही यथास्थिती राखली जाण्याचा अंदाज
gold silver price today 7 october 2024
Gold Silver Rate Today : नवरात्रोत्सवादरम्यान सोने चांदीचे दर घसरले! जाणून घ्या, तुमच्या शहरातील दर
Gold-Silver Price today 5 october 2024
Gold Silver Price : दसरा, दिवाळीपूर्वी सोन्याच्या दराने मोडले सर्व रेकॉर्ड; खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरात आज काय आहेत नवे दर?
bmw group india achieves record sales in 2024 sales at 10556 units
जानेवारी-सप्टेंबर नऊमाहीत विक्रमी १०,५५६ बीएमडब्ल्यू वाहनांची विक्री
Cost of veg thali increased 11 percent in Sept
कांदे, बटाटे, टोमॅटोचे भाव वाढल्याने सप्टेंबरमध्ये शाकाहार महागला!

मोटार उत्पादक कंपन्या आणि मोटारी भाड्याने देणाऱ्या कंपन्यांना सेकोकडून अत्याधुनिक संपर्क यंत्रणा पुरविली जाते. या संपर्क यंत्रणेच्या विकासात इंडिकस महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मोटारींमध्ये बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक संपर्क यंत्रणेमुळे तिच्यावर देखरेख ठेवणे सोपे जाते. यामुळे मोटारीच्या वेगासोबत चालकाचे नियम उल्लंघन आणि इतर अनेक बाबी तातडीने निदर्शनास येतात. सध्या इंडिकसकडून कंटिनिओ ही संगणक प्रणाली मोटार उत्पादक कंपन्या आणि मोटारी भाड्याने देणाऱ्या कंपन्यांना पुरविली जात आहे. सेकोसोबतच्या भागीदारीमुळे इंडिकसला जपानमधील बाजारपेठेत विस्तार करता येणार आहे. आगामी काळात बदलत्या तंत्रज्ञानासोबत मोटारीतील संपर्क यंत्रणेत मोठा बदल होणार आहे. त्यातून या क्षेत्राचे रूप पालटेल, असे शिल्पा व्यापारी यांनी सांगितले.