पुणे: कल्याणी समूहाचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या बाजूने त्यांच्या दिवंगत मातोश्री सुलोचना नीळकंठ कल्याणी यांनी कोणताही मुखत्यारनामा केलेला नव्हता. तसेच, त्या हयात असताना सुरू केलेल्या कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशी बाबा कल्याणी यांचा संबंध नाही, असे स्पष्टीकरण कल्याणी समूहाने सोमवारी दिले.

बाबा कल्याणी यांनी त्यांच्या मातोश्रींवर दबाव टाकल्याचा आरोप गौरीशंकर कल्याणी यांनी केला आहे. गौरीशंकर हे बाबा यांचे बंधू आहेत. गौरीशंकर यांनी याप्रकरणी सुलोचना कल्याणी यांचे प्रतिज्ञापत्रही सादर केले आहे. हे सर्व आरोप कल्याणी समूहाने फेटाळून लावले आहेत. हे आरोप खोटे असल्याचे समूहाने म्हटले असून, पुणे जिल्हा न्यायालयात याप्रकरणी खटला सुरू असून, कायदेशीर मार्गाने याला उत्तर देण्याचा इशारा दिला आहे.

Gold Silver Price Today 12th October 2024 in Marathi
Gold Silver Rate Today : दसऱ्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात आणखी वाढ, जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याचा आजचा भाव
factory growth iip
कारखानदारी क्षेत्राची वाढ उणे ०.१ टक्क्यावर, २२ महिन्यांत…
indian rupee us dollar
पडत्या रुपयाचा डॉलरमागे ८४.०९ नवीन नीचांक
insurance companies
आयुर्विमा कंपन्यांच्या पहिल्या हप्त्यापोटी उत्पन्नांत १४ टक्के वाढ, ‘एलआयसी’ची हिस्सेदारी ५८ टक्क्यांवर
Direct tax collection
प्रत्यक्ष कर संकलन १८ टक्के वाढीसह ११.२५ लाख कोटींवर
check gold silver price before Dussehra
Gold Silver Rate Today : दसऱ्याच्या तोंडावर सोने चांदीच्या दरात वाढ! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Indian businessmen rata tata
भारताच्या प्रगतीसाठी अतूट बांधिलकी, प्रमुख उद्योगपतींकडून रतन टाटा यांना आदरांजली
tata trust noel tata
टाटा न्यासाचे उत्तराधिकारी म्हणून नोएल टाटांचे नाव चर्चेत
ratan tata
रतन टाटांच्या कारकिर्दीत समूहाचा महसूल १८,००० कोटी रुपयांवरून ५.५ लाख कोटींवर

हेही वाचा : आयसीआयसीआय प्रु. व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडाची द्विदशकपूर्ती; गुंतवणुकीवर ‘निफ्टी’च्या तुलनेत दुप्पट लाभ

कल्याणी समूहाच्या प्रवक्त्याने निवेदनात म्हटल्याप्रमाणे, सुलोचना कल्याणी यांच्यावर मुखत्यारनाम्याबाबत खटले दाखल करण्यासाठी बाबा कल्याणी यांनी दबाव आणल्याचा आरोप खोटा आहे. त्यांनी बाबा कल्याणी यांच्या बाजूने कोणताही मुखत्यारनामा केलेला नाही. सुलोचना कल्याणी या गौरीशंकर यांच्या कुटुंबासमवेत त्यांच्या पार्वती निवास या निवासस्थानी राहत होत्या. तेथे असताना त्यांनी २०१२ मध्ये त्यांचे इच्छापत्र केले होते. त्यामुळे बाबा कल्याणी यांनी त्यांच्या आईवर बळजबरी केली आणि अवाजवी प्रभाव पाडल्याचा होणारा आरोप खोटा आहे. सुलोचना कल्याणी यांच्या २०१२ च्या मृत्युपत्राचे मदन टाकळे आणि एस. के. अडिवरेकर हे विश्वस्त आहेत. तथ्यांना टाळून चुकीची माहिती पसरवली जात आहे, असे कल्याणी समूहाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : Edible Oil : ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेल महागणार, आयात शुल्कात २० टक्क्यांची वाढ

गौरीशंकर कल्याणी यांनी पुणे दिवाणी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून त्यांची दिवंगत आई सुलोचना कल्याणी यांच्या २०१२ च्या मृत्युपत्राच्या अंमलबजावणीला आव्हान दिले आहे.