रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नुकतीच KYC म्हणजे नो युअर कस्टमरसाठी नवी नियमावली आणली आहे. ज्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. आर्थिक व्यवहारांमध्ये अफरातफर होऊ नये यासाठी नियम बदलण्यात आले आहेत. या नव्या बदलांमुळे ग्राहकांची ओळख पटवणं आणखी सोपं होणार आहे.

KYC म्हणजे काय?

KYC चा सोपा अर्थ Know Your Customer असा आहे. यामध्ये तुमचं नाव, ओळख, घराचा पत्ता हे सगळे तपशील असतात. बँक खातं उघडण्यासाठी KYC आवश्यक असतं. मनी लाँड्रिंग, टेरर फंडिंग हे प्रकार रोखण्यासाठी KYC संदर्भात काही मार्गदर्शक तत्त्वं लागू केली आहेत. ज्यातील बदलांनुसार तुम्हाला (ग्राहकांना) आता सध्याच्या छायाचित्रासह राहत्या घराचा पत्त्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. या पुराव्यांमध्ये वाहन चालवण्याचा परवाना, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड आदींचा समावेश आहे. याची छायाप्रत तुम्हाला बँकेत द्यावी लागणार आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

डिजिटल KYC म्हणजे काय?

डिजिटल KYC ही सेवा बँकांनी उपलब्ध करुन दिली आहे. ज्यानुसार ग्राहक बँकेशी ऑनलाइन संपर्क साधून आपला लाइव्ह फोटो देऊ शकतात. तसंच आधार कार्डसारखी कागदपत्रंही याद्वारे जमा करता येऊ शकतात. ज्या भागात तुम्ही राहताय त्या इमारतीचा फोटोही तुम्ही अपलोड करु शकता. हे अपडेट केल्याने तुमचं खातं आणखी सुरक्षित राहण्यास मदत होते.

KYC च्या नियमांमध्ये काय महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत?

बँक किंवा अर्थ पुरवठा करणाऱ्या संस्था आता अकाऊंट ओपन करतानाच केवायसीची पूर्तता करुन घेत आहेत.

ज्या खात्यांबाबत हाय रिस्क वाटते आहे अशी खात्यांवर खास नजर ठेवण्यात येते आहे.

ठराविक कालावधीनंतर KYC अपडेट करण्याचा पर्यायही उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

सेंट्रल केवायसी रेकॉर्डला नवा केवायसी डेटा सामायिक करणे

नव्या नियमांनुसार सेंट्रल केवायसी रेकॉर्ड रजिस्ट्रीला वित्तीय संस्थांनी अद्ययावत माहिती असलेला केवायसी सामायिक करणं आवश्यक आहे. बँका, अर्थविषयक संस्था यांना अपडेटेड केवायसी मिळाल्यानंतर पुढील सात दिवसात तो सेंट्रल केवायसी रजिस्ट्रीशी सामायिक करणं आवश्यक आहे. केवायसी आयडेंटिफायरचा वापर करुन वित्तीय संस्था ग्राहकाचा केवायसी पुन्हा मिळवू शकतात. त्यामुळे तीच कागदपत्रं पुन्हा सबमिट करण्याची आवश्यकता राहात नाही.

हे पण वाचा- RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत डेप्युटी गव्हर्नर पदासाठी भरती; प्रत्येक महिन्याला २.२५ लाख पगार, अर्ज कसा करायचा जाणून घ्या

केवायसीमधले हे बदल का महत्त्वाचे आहेत?

केवायसी नियमांमधले हे बदल केवायसी प्रक्रिया सोपी आणि सुलभ करण्यासाठी केले गेले आहेत. संस्थांमध्ये एक सेफ डेटा त्यामुळए तयार होतो. तसंच आर्थिक अफरातफरींना आळा घालण्यासाठी याची मोलाची मदत होणार आहे. फायनान्शिअल एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

ग्राहकांवर या नव्या बदलांचा परिणाम कसा होणार?

बँकेचे ग्राहक म्हणून तुम्ही अधिक जलदगतीने तुमचं बँक खातं उघडू शकता.

तसंच सदर नव्या नियमांमुळे केवायसीची माहिती भरतानाची प्रकिया साधी सोपी होते.

ग्राहक सुरक्षा हा या बदलांचा सर्वात मोठा फायदा आहे.

Story img Loader