scorecardresearch

Premium

RBI MPC Meeting : महागड्या कर्जातून दिलासा नाहीच, रेपो दर ६.५ टक्क्यांवरच कायम

Repo Rate Unchanged : आरबीआयच्या पतधोरणात रेपो दरात कोणताही बदल न झाल्याने बँकांना त्याच दराने कर्ज मिळत राहणार आहे. सलग पाचव्यांदा रिझर्व्ह बँकेने आपल्या धोरणात्मक दरांमध्ये कोणतेही बदल केले नाहीत आणि ते स्थिर ठेवलेत.

RBI MPC Meeting Repo Rate Unchanged Marathi News
आरबीआय एमपीसी बैठक रेपो दर स्थिर (फोटो क्रेडिट- फायनान्शिअल एक्सप्रेस)

RBI MPC Meeting Latest Updates : भारतीय रिझर्व्ह बँकेने आज पतधोरण जाहीर केले असून, रेपो दर आणि इतर धोरण दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज आपल्या भाषणात ही घोषणा केली. त्यामुळे आता कर्जाच्या ईएमआयवर कोणतीही सवलत मिळणार नाही किंवा ती वाढणारही नाही, कारण आरबीआयने रेपो दर जैसे थे कायम ठेवले आहेत. रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम राहणार आहे.

RBI ने सलग पाचव्यांदा व्याजदर स्थिर ठेवले

आरबीआयच्या पतधोरणात रेपो दरात कोणताही बदल न झाल्याने बँकांना त्याच दराने कर्ज मिळत राहणार आहे. सलग पाचव्यांदा रिझर्व्ह बँकेने आपल्या धोरणात्मक दरांमध्ये कोणतेही बदल केले नाहीत आणि ते स्थिर ठेवलेत.

OBC
ओबीसींचा खरा शत्रू कोण?
Benefits of cuddling for health
हृदयाच्या आरोग्यापासून ते उत्तम झोपेपर्यंत ‘Cuddling’, ‘मिठी मारणे’ ठरते फायदेशीर! काय सांगतात डॉक्टर पाहा…
New Taxation
Money Mantra : करावे कर समाधान – नवीन करप्रणाली : गृहकर्जावरील व्याजाची वजावट मिळते?
50 percent of type 2 diabetes patients asymptomatic what tests should they take to detect their condition doctor said
५० टक्के लोकांना टाईप २ डायबिटीसची लक्षणे दिसत नाहीत! तुम्हीही कोणत्या चाचण्या करून घ्यायला हव्या?

GDP साठी रिझर्व्ह बँकेचा अंदाज

रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२४ साठी सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) अंदाज ६.५ टक्क्यांवरून ७ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. आरबीआयने क्रेडिट पॉलिसीमध्ये ‘विथड्रॉव्हल ऑफ अ‍ॅकॉमोडेशन’ची भूमिका कायम ठेवली आहे.

RBI गव्हर्नर यांच्या UPI साठी २ नवीन घोषणा

पहिली घोषणा

RBI गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रत्येक व्यवहारासाठी UPI व्यवहार मर्यादा १ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात येत आहे. यामुळे शिक्षण आणि आरोग्य सेवा क्षेत्रासाठी UPI व्यवहारांना फायदा होणार आहे.

दुसरी घोषणा

चलनविषयक धोरणाच्या बैठकीत आवर्ती स्वरूपाच्या पेमेंटसाठी ई-आदेशात बदल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या अंतर्गत आवर्ती व्यवहारांसाठी UPI मर्यादा प्रति व्यवहार १ लाख रुपये करण्यात येत आहे. अशा UPI पेमेंटची मर्यादा १५ हजार रुपयांवरून १ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आरबीआय गव्हर्नरने त्यांच्या अभिभाषणात मांडला आहे. या अंतर्गत UPI मर्यादा प्रामुख्याने म्युच्युअल फंड सबस्क्रिप्शन, विमा पॉलिसी प्रीमियम आणि क्रेडिट कार्ड परतफेडीसाठी आवर्ती UPI पेमेंटसाठी वाढेल.

शेअर बाजारात उत्साह, निफ्टीने पहिल्यांदाच २१ हजारांचा टप्पा केला पार

शेअर बाजाराने आरबीआयचे पतधोरण तात्काळ स्वीकारले आहे. आरबीआय गव्हर्नरचे भाषण सुरू होताच निफ्टीने २१,००५.०५ हा विक्रमी उच्चांक गाठला आणि २१००० ची ऐतिहासिक पातळी ओलांडताना दिसली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rbi monetary policy no relief from expensive loans repo rate remains at 6 5 percent vrd

First published on: 08-12-2023 at 11:08 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×