रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBI नं नुकतंच लंडनमधून तब्बल १०० टन सोनं भारतात हलवलं आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत आरबीआयनं घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यासंदर्भात खुद्द आरबीआयकडून स्पष्टीकरण देण्यात आलं असून त्याबाबतचं सविस्तर वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. याआधी थेट ३३ वर्षांपूर्वी १९९१ सालच्या आर्थिक घडामोडींदरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोनं भारतात आणण्यात आलं होतं. तसेच, येत्या काही महिन्यांत आणखी इतकंच सोनं पुन्हा एकदा लंडनमधून भारतात आणलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

सोनं नेमकं कुणाचं, कुणाकडून भारतात आलं?

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, हे सोनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचंच असून लंडनमधील बँक ऑफ इंग्लंडच्या सुरक्षेत ठेवण्यात आलं होतं. जगभरातील अनेक देशांच्या केंद्रीय बँकांकडून सोनं ठेवण्यासाठी बँक ऑफ इंग्लंडला प्राधान्य दिलं जातं. आरबीआयनंही त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या सोन्याच्या साठ्यापैकी काही सोनं बँक ऑफ इंग्लंडमध्ये ठेवलं होतं. त्याच साठ्यातलं जवळपास १०० टन सोनं भारतात आणण्यात आलं आहे.

bhopal 1800 crore drug case
धक्कादायक! १८०० कोटी रुपयांच्या ‘त्या’ ड्रग्ज प्रकरणातील आरोपीने स्वत:वर झाडली गोळी; आधी पोलीस ठाण्यात शिरला, नंतर…
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
insurance companies
आयुर्विमा कंपन्यांच्या पहिल्या हप्त्यापोटी उत्पन्नांत १४ टक्के वाढ, ‘एलआयसी’ची हिस्सेदारी ५८ टक्क्यांवर
Success Story of Pearl Kapur Indias Youngest billionaire builted Zyber 365 company
अवघ्या २७व्या वर्षीच अब्जाधीश, ३ महिन्यातच उभारली कोटींची कंपनी, वाचा कोण आहे ‘हा’ भारतीय उद्योगपती?
40000 crores investment china marathi news
चिनी अर्थव्यवस्थेची उभारी भारताच्या शेअर बाजाराच्या मूळावर; सलग सहा सत्रातील घसरणीत ४०,००० कोटींच्या गुंतवणुकीचे चीनकडे वळण
Sebi approves Hyundai and Swiggy IPOs print eco news
‘सेबी’कडून ह्युंदाई आणि स्विगीच्या महाकाय आयपीओंना मंजुरी; दोन्ही कंपन्यांकडून ३५,००० कोटींची निधी उभारणी अपेक्षित
Development of 39 agar station sites of ST on commercial basis Print politics news
‘एसटी’च्या ३९ जागांचा व्यापारी तत्त्वावर विकास; भाडेपट्ट्याच्या कालावधीसह चटईक्षेत्र निर्देशांकात वाढ
indus water treaty
Indus Water Treaty : भारताची पाकिस्तानला ६४ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ कराराबाबत नोटीस; उत्तरादाखल पाकिस्तान म्हणतो, “भारतही…”

ताज्या आकडेवारीनुसार, आरबीआयच्या साठ्यात सध्या ८२२.१ टन इतकं सोनं आहे. त्यातला ४१३.८ टन सोन्याचा साठा हा विदेशी बँका आणि सुरक्षा व्यवस्थांमध्ये ठेवण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आरबीआयनं वेगवेगळ्या माध्यमातून सोनं खरेदी करून आपल्या साठ्यात वाढ केली आहे. गेल्या आर्थिक वर्षात आरबीआयनं २७.५ टन सोन्याची खरेदी केली होती.

एवढं सोनं भारतात आणण्याचं कारण काय?

आरबीआयमधील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या या वृत्तामध्ये सोनं भारतात आणण्याचं आरबीआयकडून देण्यात आलेलं कारण नमूद करण्यात आलं आहे. नियमित कालावधीनंतर आरबीआय त्यांच्या साठ्यातील सोन्याचा आढावा घेत असते. यातलं किती सोनं कुठे ठेवलं आहे? याचा अंदाज घेतला जातो. त्यानुसार, सोन्याचा साठा एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवण्यात येतो. यामध्ये गेल्या काही वर्षांत विदेशात असलेल्या साठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. त्यामुळेच, या सोन्यापैकी १०० टन सोनं मार्च महिन्यात हलवण्याचा निर्णय झाला. त्याव्यतिरिक्त एवढंच आणखी सोनं येत्या काही महिन्यांत पुन्हा हलवलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

बँकांचे १३,९३० कोटी फसवणुकीत फस्त : रिझर्व्ह बँक

सोनं भारतात आणलं कसं?

आरबीआयनं हे १०० टन सोनं भारतात आणण्यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणांनी सज्ज असणाऱ्या विशेष विमानाचा वापर केला. तसेच, त्यासाठी अर्थमंत्रालय व इतर केंद्रीय विभागांमध्ये समन्वय साधण्यात आला होता. यासाठी आरबीआयनं अर्थ मंत्रालयाकडून कस्टम ड्युटीमध्ये विशेष सूट घेतली होती. मात्र, जीएसटीमध्ये सूट देण्यात आली नाही. त्यातला हिस्सा सर्व राज्यांनाही जात असल्याचं कारण यासाठी दिलं जात आहे. हे सोनं भारतात आल्यामुळे आरबीआयचा या सोन्याच्या सुरक्षेसाठी, साठवणुकीसाठी होणारा खर्चही काही प्रमाणात कमी होणार आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये आरबीआयनं आपल्या सोन्याच्या साठ्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ केली आहे. त्यानुसार २०१९ मध्ये हा साठा ६१८.२ टन इतका होता. २०२०मध्ये तो ६६१.४ टन इतका झाला. २०२१मध्ये साठ्याचं प्रमाण ६९५.३ टन इतकं झालं. २०२२, २०२३ आणि २०२४ मध्ये हे प्रमाण अनुक्रमे ७६०.४ टन, ७९४.६ टन आणि ८२२.१ टन असं टप्प्याटप्प्याने वाढत गेलं.