लोकसत्ता व्यापार प्रतिनिधीमुंबई: जागतिक पातळीवरील मानकांनुसार नियमितपणे सांख्यिकी गुणांकन करण्यासाठी डेप्युटी गव्हर्नर मायकेल पात्रा यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करत असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने सोमवारी केली. सांख्यिकी गुणांकनावरील ही १० सदस्यीय समिती आहे. समितीला या वर्षी नोव्हेंबरअखेरपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. या समितीचे नेतृत्व मायकेल पात्रा हे करणार असून, नियमित आकडेवारीची गुणवत्ता तपासण्याचे कामही समिती करणार आहे. याचबरोबर राष्ट्रीय प्राधान्याच्या क्षेत्रात मानके निर्धारीत केलेली नसल्यास त्यात सुधारणा करण्याबाबचे उपायही सुचविणार आहे. रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक मुनीश कपूर आणि ओ.पी.मॉल यांचा समितीत सदस्य म्हणून समावेश आहे.समितीच्या इतर सदस्यांमध्ये राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे माजी अध्यक्ष आर.बी.बर्मन, नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चच्या सोनलडे देसाई, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंटचे पार्था रॉय, राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे माजी अध्यक्ष बिमल रॉल, ओईसीडीचे माजी मुख्य सांख्यिकी-तज्ज्ञ पॉल श्रेयर, बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्समधील सांख्यिकी व संशोधन विकास विभागाचे प्रमुख ब्रुनो टिसॉट आणि रिझर्व्ह बँकेचे माजी कार्यकारी संचालक सुदर्शन सेन यांचा समावेश आहे.