लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : डिजिटल पायाभूत सुविधांमुळे कर्ज मंजुरीची प्रक्रिया ऑनलाइन आणि तत्पर बनली आहे, मात्र कर्जवसुली ही भौतिक धाटणीने आणि मानवी सहानुभूती राखूनच होण्याची आवश्यकता भासत आहे, असे नमूद करीत रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर स्वामिनाथन जे. यांनी अनेक वित्ततंत्रज्ञान (फिनटेक) कंपन्यांकडून कर्जाच्या वसुलीसाठी वापरात येणाऱ्या चुकीच्या पद्धतीबद्दल सोमवारी येथे नापसंती व्यक्त केली.

rbi urban cooperative banks
नागरी सहकारी बँकांना भांडवल उभारणीचे नवीन मार्ग, रिझर्व्ह बँकेकडून चर्चात्मक दस्ताचा प्रस्ताव
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
kalyani strategic systems collaborates with us defence companies
कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्सचा अमेरिकी संरक्षण कंपन्यांशी करार; अत्याधुनिक तोफा मंच बनविण्यासाठी भागीदारीचे पाऊल
Success Story Harshita In marathi
Success Story : एक मोठी जबाबदारी अन् गृहकर्जाच्या जोखमीचं मूल्यांकन करण्यासाठी तयार केलं नवं मॉडेल; वाचा हर्षिता यांची प्रेरणादायी कहाणी
Loksatta explained Why did the controversy rise over the same policy of Barty Sarathi Mahajyoti
विश्लेषण: बार्टी, सारथी, महाज्योतीच्या समान धोरणावरून वाद का चिघळला?
RBI Governor Shaktikanta Das statement on inflation control
महागाई नियंत्रणासाठी विकासाचा बळी नको; रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे प्रतिपादन
Pimpri-Chinchwad cameras AI technology,
आता अत्याधुनिक कॅमेऱ्यांद्वारे पिंपरी-चिंचवडवर नजर, ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर; २५७० ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांचे जाळे
9 out of 10 people make losses in F&Os according to a report by capital markets regulator SEBI
‘एफ अँड ओ’मध्ये १० पैकी ९ जण तोट्यात; भांडवली बाजार नियंत्रक सेबीच्या अहवालातून धक्कादायक वास्तव उघड

डिजिटल पायाभूत सुविधा आल्याने वित्ततंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्या पत नसणाऱ्या ग्राहकांना कर्जे देत आहेत, मात्र त्यांच्याकडून वसुलीसाठी आक्रमक पद्धतींचा त्या अवलंब करीत आहेत, असे सांगून स्वामिनाथन म्हणाले की, कर्ज मंजुरी आणि वितरणाची प्रक्रिया ही अधिकाधिक डिजिटल बनली आहे. याचवेळी वसुलीच्या प्रक्रियेसाठी अद्याप माणसांची आवश्यकता भासत आहे आणि अनेक वेळा नैतिक सीमारेषा ओलांडली जाते.

आणखी वाचा-मिश्र इंधन वाहनांवरील जीएसटी कमी करा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची राज्यांच्या अर्थमंत्र्यांना आवाहन

ग्राहकाचा खासगीपणा जपणे आवश्यक असताना अनेक वेळा त्याचा भंग केला जातो. वसुली करणारे एजंट ग्राहकाची खासगी माहिती आणि त्याच्या संपर्कातील व्यक्ती यांची माहिती घेतात. वसुलीसाठी या माहितीची गैररीत्या वापर करून ग्राहकाला धमकावले जाते. या सर्व प्रकारांमुळे काही ठरावीक वित्ततंत्रज्ञान मंच नव्हे तर संपूर्ण वित्तीय परिसंस्थेची अप्रतिष्ठा होते, असेही स्वामिनाथन यांनी नमूद केले.

‘गैरवर्तनाची जबाबदारीही टाळू नका’

रिझर्व्ह बँकेची मान्यता असलेल्या अनेक वित्तीय संस्थांकडून कर्ज वसुलीसाठी त्रयस्थ संस्थांचा वापर केला जातो. या त्रयस्थ संस्थांच्या एजंटाकडून चुकीच्या पद्धतीने वसुली व गैरवर्तन झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित वित्तीय संस्थेला टाळता येणार नाही. वसुली एजंटाच्या चुकीसाठी ही वित्तीय संस्थादेखील तेवढीच जबाबदार असेल, असेही स्वामिनाथन यांनी स्पष्ट केले.