ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांनी एक असा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे ब्रिटनपासून भारतापर्यंत सर्वांनाच धक्का बसला आहे. होय, त्यांनी आपली जवळपास १० वर्षे जुनी कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या पतीबरोबर ही कंपनी सुरू केली होती, मात्र पतीने राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी कंपनीचा राजीनामा दिला. सध्या या कंपनीत अक्षता या एकमेव संचालक उरल्या होत्या.
अक्षता मूर्ती इन्फोसिसचे सह संस्थापक नारायण मूर्ती यांच्या कन्या आहेत. अलीकडेच त्या पती आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याबरोबर भारतात झालेल्या जी २० परिषदेत दिसल्या. यादरम्यान दोघांचा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये अक्षता आणि ऋषी सुनक एकाच छत्रीखाली रस्त्यावरून चालताना पावसाचा आनंद घेत असल्याचं दिसलं होते. अक्षताने कंपनीबाबत नेमका कोणता निर्णय घेतला आहे हे जाणून घेणार आहोत.
ही कंपनी १० वर्षांपूर्वी सुरू झाली होती
अक्षताने तिच्या पतीबरोबर २०१३ मध्ये कॅटामरन व्हेंचर्स यूके लिमिटेड हा गुंतवणूक उपक्रम सुरू केला. सुनक यांनी राजकारणात प्रवेश केल्यावर २०१५ मध्ये कॅटामरन व्हेंचर्सच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, कॅटामरनच्या एकमेव संचालक अक्षताने आता तिची फर्म बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वर्षभरात संचालकांनी कंपनी गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत कंपनीचे गुंतवणूक मूल्य ३८ लाख पौंडांपेक्षा किंचित जास्त होते आणि २०२१ मध्ये ते ३५ लाख पौंडांपेक्षा जास्त होते. अक्षता मूर्तींची थकबाकी ४६ लाख पौंड होती. कॅटामरन व्हेंचर्स यूके लिमिटेड ही भारतीय सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसमधील अक्षताच्या शेअर्समधून मिळालेल्या पैशासाठी गुंतवणुकीचे साधन म्हणून काम करीत आहे. अक्षताचे वडील एनआर नारायण मूर्ती हे इन्फोसिसचे सह संस्थापक आहेत.
अनेक वादही झालेत
कॅटामरन-समर्थित एज्युकेशन स्टार्टअप वर्डस्मिथ ब्रिटिश सरकारच्या फ्यूचर फंड नावाच्या साथीच्या मदत योजनेतून ६.५ दशलक्ष डॉलर मिळाल्यानंतर सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत बंद झाली, असं वृत्त द टाइम्सने दिले. याशिवाय कॅटामरन समर्थित फर्निचर कंपनी न्यू क्राफ्ट्समनलाही या निधीचा फायदा झाला. स्टडी हॉल या एडटेक फर्म ज्यामध्ये कॅटामरनचा हिस्सा आहे, त्यांना गेल्या वर्षी इनोव्हेट यूकेकडून ३.५ लाख पौंडांचे अनुदान मिळाल्यावर विरोधी मजूर पक्षाने प्रश्न उपस्थित केला होता. तसेच अक्षताने कोरू किड्स या चाइल्ड केअर कंपनीमध्ये गुंतवणूक केल्याचे समोर आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता आणि तिला ब्रिटिश सरकारच्या बजेट स्कीमचा फायदा होत होता.
मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishi sunak and akshata murty startup to shut down of rs 8320 crore know more about catamaran ventures controversy vrd