मुंबई: मंगळवारी अखेरच्या तासात रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकी पातळीवरून ८ पैशांनी सावरून ८६.६२ पातळीवर स्थिरावला. खनिज तेलाच्या वाढत्या किमती आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या निधी निर्गमनामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयावर दबाव वाढत आहे.

देशांतर्गत आघाडीवर किरकोळ महागाई दरात घसरणीच्या दिलासादायी आकडेवारीमुळे भांडवली बाजार देखील सलग चार सत्रातील पडझडीतून सावरल्याने रुपयाला आधार मिळाला. स्थानिक चलन बाजारात, रुपयाने ८६.५७ पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. दिवसभरातील सत्रात त्याने ८६.४५ या उच्चांकाला स्पर्श केला आणि नंतर दिवसाच्या शेवटी ८६.६२ प्रति डॉलर पातळीवर तो बंद झाला, त्याच्या मागील बंद किमतीपेक्षा त्यात ८ पैशांनी वाढ नोंदवण्यात आली.

rupee crosses 87 against dollar news in marathi
रुपया डॉलरमागे ८७ पार; सोने ८५ हजारांपुढे!, रुपयाच्या आणखी घसरणीची शक्यता
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
share market update bse nifty share bazar stock market
Marker roundup : ‘सेन्सेक्स’मध्ये सलग दुसऱ्या सत्रात मजबूत ६३१ अंशांची भर; दलाल स्ट्रीटवरील आजच्या तेजीमागील दडलंय काय?
Rupee biggest fall in two weeks print eco news
रुपयाची दोन आठवड्यांतील सर्वात मोठी आपटी
bombay stock exchange update Sensex nifty share market points
Market roundup : शेअर बाजारात ‘सेन्सेक्स’ची ९०० अंशांची फेरउसळी; बाजारातील तेजीचे तीन मुख्य घटक कोणते?
70% of BSE500 stocks are in a bear phase; investors consider buying the dip before Union Budget 2025.
BSE500 मधील ७० टक्के शेअर्स मंदीच्या टप्प्यात, अर्थसंकल्पापूर्वी गुंतवणूक करणे योग्य ठरणार का?
sensex plunges 325 points at the end of the week reasons behind stock market
Marker Roundup: शेअर बाजारात सप्ताहअखेर सेन्सेक्सला ३२५ अंशांची गळती; जाणून घ्या घसरणीची कारणे
raghuram rajan rbi loksatta news
Raghuram Rajan : डॉलरच्या तुलनेत घसरत्या रुपयाबाबत रघुराम राजन यांनी दिला महत्त्वाचा इशारा

हेही वाचा >>> वैयक्तिक प्राप्तिकरातील वाढ अर्थव्यवस्थेसाठी वरदान; प्रत्यक्ष कर संकलन १२ जानेवारीपर्यंत १६.९० लाख कोटींवर

सोमवारच्या सत्रात, रुपयाने दोन वर्षांतील सर्वात मोठी घसरण नोंदवली आणि सत्राच्या शेवटी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ६६ पैशांनी घसरून तो ८६.७० या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर बंद झाला होता. याआधी ६ फेब्रुवारी २०२३ रोजी रुपयाने डॉलरच्या तुलनेत एक सत्रात विक्रमी ६८ पैशांची घसरण अनुभवली होती.

हेही वाचा >>> घाऊक महागाई वाढली; अन्नधान्यांच्या किमतीमुळे नव्हे तर…; महागाई दर डिसेंबरमध्ये वाढून ….

पंधरवड्यात १०० पैशांनी घसरण

डॉलरच्या तुलनेत रुपया ३० डिसेंबर २०२४ रोजी ८५.५२ या पातळीवर बंद झाला होता. आता दोन आठवड्याच्या कालावधीनंतर त्यात १०० पैशांहून अधिक घसरण झाली आहे. १९ डिसेंबर २०२४ रोजी पहिल्यांदाच त्याने ८५ रुपये प्रति डॉलरचा टप्पा ओलांडला होता. डिसेंबर महिन्यांपासून रुपयाने तब्बल २ टक्क्यांचे अवमूल्यन सोसले आहे.

देशांतर्गत भांडवली बाजार सावरल्याने प्रबळ अमेरिकी डॉलरपुढे रुपयाला सार्वकालिक नीचांकी पातळीवरून सावरता आले. शिवाय किरकोळ महागाई कमी झाल्याने रुपयाच्या मूल्याला दिलासा मिळाला. मात्र खनिज तेलाच्या किमती वाढत्या राहिल्याने रुपया आणखी कमकुवत होण्याची भीती कायम आहे. ज्याचा एकंदर महागाईवर विपरित परिणाम होऊ शकेल. – अनुज चौधरी, संशोधन विश्लेषक, मिरे ॲसेट शेअरखान

Story img Loader