scorecardresearch

सौदी नॅशनल बँकेच्या अध्यक्षांचा राजीनामा, ‘क्रेडिट सुईस’बाबत वक्तव्य भोवल्याची चर्चा

क्रेडिट सुईस बँकेबाबत केलेल्या त्यांनी वक्तव्यामुळे त्या बँकेवर ओढवलेल्या संकटांच्या परिणामी त्यांना पायउतार व्हावे लागल्याची चर्चा आहे.

Saudi National Bank
(फोटो सौजन्य- इंडियन एक्सप्रेस)

वृत्तसंस्था, दुबई

सौदी नॅशनल बँकेचे अध्यक्ष अम्मार अल-खुदायरी यांनी सोमवारी त्यांचा पदाचा राजीनामा दिला. त्यांनी हा राजीनामा जरी व्यक्तिगत कारणास्तव दिल्याचे म्हटले असले, तरी क्रेडिट सुईस बँकेबाबत केलेल्या त्यांनी वक्तव्यामुळे त्या बँकेवर ओढवलेल्या संकटांच्या परिणामी त्यांना पायउतार व्हावे लागल्याची चर्चा आहे.

रियाधमधील तदावुल भांडवली बाजाराने खुदायरी यांच्या राजीनामा दिल्याचे वृत्त सोमवारी जाहीर केले. खुदायरी यांच्या राजीनाम्यावर रविवारची (२६ मार्च) तारीख आहे. त्यांनी १५ मार्चला, सर्वात मोठे भागधारक असलेल्या सौदी नॅशनल बँकेकडून क्रेडिट सुईसमध्ये आणखी गुंतवणूक केली जाणार नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. या वक्तव्याचे नकारात्मक परिणाम होत, भांडवली बाजारात क्रेडिट सुईसचे समभाग ३० टक्क्यांनी आपटले होते. या बँकेवरील आर्थिक संकट पटलावर आले.

आणखी वाचा- फर्स्ट सिटिझन्स बँकेकडून दिवाळखोर सिलिकॉन व्हॅली बँकेचे संपादन

तथापि क्रेडिट सुईस अडचणीत आल्यानंतर स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती बँकेने ५० अब्ज फ्रँक्सची (५४ अब्ज डॉलर) कर्ज देण्याची तिला तयारी दर्शवली होती. अखेर स्विस नियामकांनी पुढाकार घेऊन क्रेडिट सुईसचे प्रतिस्पर्धी यूबीएस बँकेत विलीनीकरण पूर्णत्वास नेले. बँकिंग संकट आणखी वाढू नये, यासाठी नियामकांनी हे पाऊल उचलले.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 12:17 IST

संबंधित बातम्या