SBI : गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. मात्र सुरक्षित गुंतवणूक आणि एसबीआय यांचं एक समीकरण तयार झालं आहे. एसबीआय उत्तम व्याजाचे रिटर्न्स देणारी बँक आहे. त्यांची एक योजना चर्चेत आहे. ज्या योजनेचं नाव आहे अमृत कलश एफ.डी. योजना. आपण जाणून घेऊ या योजनेबाबत.
काय आहे एसबीआयची अमृत कलश योजना?
देशातली सर्वात मोठी सरकारी बँक असा एसबीआयचा लौकिक आहे. याच बँकेने ४०० दिवसांच्या FD ची अमृत कलश योजना आणली. FD योजनांमधली ही लोकप्रिय योजना आहे. मात्र आता या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ येत आहे. कारण ही योजना आता बंद केली जाणार आहे. अमृत कलश योजना असं या योजनेचं नाव आहे.
वरिष्ठ नागरिकांना योजनेचा फायदा
करोना काळात महागाईचे उच्चांक समोर आले होते. त्यावेळी अनेक बँकांनी एफडी म्हणजेच फिक्स डिपॉझिटवर मिळणारे व्याजदर वाढवले होते. एसबीआयच्या अमृत कलश एफडी योजनेचा समावेश अशाच मोठ्या योजनांमध्ये होतो. ४०० दिवसांच्या या योजनेत ग्राहकांना ७.१० टक्के व्याज दिलं जातं आहे. तर वरिष्ठ नागरिकांसाठी हे व्याज ७.६० टक्के इतकं आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना फायदा झाला आहे.
लवकरच ही योजना होणार बंद
एसबीआयने आणलेली गुंतवणुकीची योजना लवकरच बंद होणार आहे. अमृत कलश योजना १२ एप्रिल २०२३ या दिवशी सुरु झाली होती. ज्यानंतर तिची मुदत २३ जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली. अशा पद्धतीने डेडलाइन वाढत ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत केली होती. २३ सप्टेंबर ते ३१ मार्च अशी डेडलाइन पुन्हा देण्यात आली.त्यानंतर ३१ मार्च २०२५ ही योजना वाढवण्यात आली.
अमृत कलश योजनेत कसं व्याज मिळतं?
कुठलाही ग्राहक अमृत कलश योजनेसाठी पैसे गुंतवू शकतो. एखाद्या ग्राहकाने जर १ लाख रुपये जमा केले. तर त्याला वार्षिक ७ हजा १०० रुपये इतकं व्याज मिळेल. ही योजना ४०० दिवसांसाठी आहे. या योजनेच्या अंतर्गत ४०० दिवसांसाठी मुदत आहे. त्यानंतर ही एफडी मॅच्युअर्ड होईल. या योजनेत २ कोटी रुपये गुंतवण्याच्या रक्कमेपर्यंतची तरतूद आहे. ज्येष्ठ नागरिक म्हणजेच सीनियर सिटिझन यांच्यासाठी व्याजदर वेगळे आहेत.
कधी घेऊ शकता व्याज?
अमृत कलश योजनेत रक्कम गुंतवल्यानंतर त्याचं व्याज तुम्ही मासिक, त्रैमासिक किंवा सहा महिन्यानी घेऊ शकता. या योजनेत पैसे गुंतवायचे असतील तर ३१ मार्च २०२५ च्या आधी गुंतवा. SBI च्या बँकिंग अॅपचा उपयोग करुनही तुम्ही या योजनेत पैसे गुंतवू शकता. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.