लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: भांडवली बाजारात सूचिबद्ध होत असलेल्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम श्रेणीतील अर्थात एसएमई कंपन्यांचे प्रमाण आणि त्यातून गुंतवणूकदारही भरभरून लाभ कमावत असल्याचे चित्र आहे. तथापि परताव्याचे लक्षणीय प्रमाण पाहता, सावधगिरी म्हणून बाजार नियामक ‘सेबी’ तसेच बाजार मंचांनीही सूचिबद्ध एसएमई कंपन्यांना अल्प-मुदतीच्या अतिरिक्त पाळत उपायांतर्गत (एएसएम) आणि ट्रेड फॉर ट्रेड (टीएफटी) उपायांतर्गत आणण्याचा निर्णय घेतला आहे. आजवर हे उपाय केवळ मुख्य बाजारमंचावर सूचिबद्ध कंपन्यांपुरते सीमित होते.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

एसएमई कंपन्यांच्या समभाग मूल्यातील लक्षणीय वाढीच्या पार्श्वभूमीवर ‘एएसएम’ निर्देशांअंतर्गत अल्पावधीसाठी अतिरिक्त पाळतीचा निर्णय घेण्यात आल्याचे सोमवारी सायंकाळी स्पष्ट करण्यात आले. समभागांतील वध-घट, त्यातील गुंतवणूकदारांचे केंद्रीकरण, तळाच्या आणि वरच्या किंमत मर्यादेपर्यंत समभाग घरंगळण्याचे प्रमाण, नजीकच्या बंद भावांमधील मोठी तफावत अशा निकषांवर हा निर्णय घेतला जातो. सध्याच्या एसएमई कंपन्यांच्या समभागांमध्ये काही गुंतवणूकदारांकडून संशयास्पद हेराफेरी, किमतींमध्ये फेरफार आणि उन्माद लक्षात घेता असा निर्णय घेतला जाणे आधीपासून अपेक्षित होते.

हेही वाचा… ‘कॉसमॉस’मध्ये एसडीसी बँकेचे विलीनीकरण; मुंबईतील शाखांची संख्या ५० वर

अतिरिक्त देखरेख उपाय हा बाजारमंच आणि सेबीचे गुंतवणूकदारांचे हितरक्षण करण्यासाठी उचलण्यात येणारे एक पाऊल आहे. एएसएम अंतर्गत समभागांतील व्यवहारांचे काटेकोर परीक्षण केले जाते. शिवाय ट्रेड-फॉर-ट्रेड विभागात असल्यामुळे फक्त ‘डिलिव्हरी’ व्यवहारांना परवानगी आहे. बऱ्याचदा एएसएम अंतर्गत असलेल्या समभागांमध्ये ‘इंट्रा-डे ट्रेडिंग’ व्यवहार हे १०० टक्के आगाऊ रक्कम मोजूनच होतात, ज्यातून या समभागांमधील सट्ट्याला आळा बसणे अपेक्षित असते.

‘एसएमई आयपीओ’कडून परतावा किती?

‘प्राइम डेटाबेस’च्या माहितीनुसार, विद्यमान २०२३ मध्ये एसएमई आयपीओची लोकप्रियता इतकी वाढली की, त्यांनी सरासरी ६७ पट अधिक प्रतिसाद अनुभवला आहे. त्यांच्यापैकी काहींना तर ७१३ पट प्रतिसाद मिळाला आहे. २०२३ मध्ये सूचिबद्ध झालेल्या १०७ एसएमई कंपन्यांच्या समभागांनी आतापर्यंत सरासरी ७७ टक्के परतावा दिल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. काही समभागांनी केवळ ४ ते ५ महिन्यांत चारपट परतावा मिळवून दिला आहे. यातील केवळ १९ कंपन्यांनी गुंतवणूकदारांची निराशा केली.

१०३ पट परताव्याची अद्भुत तेजी

बीएसई एसएमई आयपीओ निर्देशांक हा ६० पेक्षा अधिक एसएमई समभागांचा एक प्रातिनिधिक निर्देशांक आहे. ज्याने गेल्या १० वर्षात तब्बल १०,३५० टक्के परतावा दिला आहे, शिवाय तो ५९ टक्के या चक्रवाढ वार्षिक वाढ दराने वाढला आहे. याचा अर्थ सप्टेंबर २०१३ मध्ये गुंतवलेले फक्त १,००० रुपये आज २०२३ मध्ये १.०३ लाख रुपये झाले असते. या अशा अद्भुत तेजीने बाजार मंच आणि सेबीची चिंता वाढवली आहे. गेल्या पाच वर्षांत, निर्देशांकाने वर्षाला ८२.६३ टक्के आणि गेल्या तीन वर्षांत सरासरी १९३ टक्के चक्रवाढ दराने परतावा दिला आहे. शिवाय बाजारात आणि जागतिक पातळीवर अनिश्चिततेचे वातावरण असूनदेखील या मंचावरील तेजी कायम आहे.

बीएसई एसएमई मंचावर सूचिबद्ध कंपन्यांच्या कामगिरीचा मागोवा घेण्यासाठी २०१२ मध्ये हा निर्देशांक सादर करण्यात आला. या निर्देशांकाची रचना म्हणजेच या मंचावर सूचिबद्ध होणाऱ्या कंपन्या त्यातील घटक असतात. बाजार सूचिबद्धतेला एक वर्ष पूर्ण केल्यानंतर, त्या कंपन्या निर्देशांकातून वगळल्या जातात. याउलट निफ्टी किंवा सेन्सेक्समध्ये अनेक कंपन्या वर्षानुवर्षे त्या निर्देशांकाचा भाग असतात.