नवी दिल्ली : भांडवली बाजारात व्यवहार करण्यासाठी उघडण्यात येणारे ट्रेडिंग आणि डिमॅट खातेधारकांना नामनिर्देशनाची (नॉमिनी) नोंद किंवा नामनिर्देशन रद्द करण्यासाठी मुदत भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने सप्टेंबर अखेरपर्यंत मंगळवारी वाढवण्याचा निर्णय घेतला. पूर्वनिर्धारित वेळापत्रकाप्रमाणे याची मुदत ३१ मार्च २०२३ रोजी संपुष्टात येणार होती.

हेही वाचा >>> ‘पॅन’ संलग्नतेला मुदतवाढीचा ‘आधार’

High Court
अपंगांसाठीचे कायदे पुस्तकापुरते मर्यादित ठेवू नका, दृष्टीहीन महिलेला रेल्वेतील नोकरीबाबत दिलासा देताना उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
AJIT PAWAR AND BUDGET
सौर कृषीपंप ते कृषी महाविद्यालयास मान्यता, अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नेमकं काय? वाचा…
promote electric vehicles in India
भारतात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी तीन प्रस्ताव, कोणता ठरणार फायदेशीर?
Investing for tax benefit including SIP or Lump Sum Investment Multi asset fund filed by Mahindra Manulife print eco news
SIP अथवा एकरकमी गुंतवणुकीसह कर लाभासाठी गुंतवणूक; महिंद्रा मनुलाइफकडून ‘मल्टी ॲसेट फंड’ दाखल

ट्रेडिंग आणि डिमॅट खात्यांसाठी नामनिर्देशनाची नोंदणी करणे अथवा हा पर्याय अस्वीकृत करणे यापैकी एक पर्याय स्वीकारणे गुंतवणूकदारांना आवश्यक आहे. हा पर्याय न स्वीकारल्यास ट्रेडिंग आणि डिमॅट खाते गोठवले जाईल, असा इशाराही ‘सेबी’ने दिला होता. मात्र आता ही मुदत ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. भांडवली बाजारातील मध्यस्थ अर्थात दलाल, दलाली पेढ्या आणि डिपॉझिटरी यांनी त्यांच्या ग्राहकांना वारस नोंदणीचा एक पर्याय स्वीकारण्याबाबत आठवण करून देणारे ई-मेल आणि एसएमएस पंधरवड्याच्या कालावधीत पाठवावेत, अशी सूचनाही ‘सेबी’ने केली होती. आधी नामनिर्देशित व्यक्तीची नोंदणी केलेल्या गुंतवणूकदारांनाही नव्याने नोंदणी करावी लागणार आहे. परंतु, ज्यांनी नोंदणी केलेली नसेल त्यांना नोंदणी करणे अथवा नोंदणी करीत नसल्याचा पर्याय निवडणे आवश्यक आहे. ज्या गुंतवणूकदारांनी १ ऑक्टोबर २०२१ नंतर नवीन ट्रेडिंग आणि डीमॅट खाते उघडले आहे, त्यांनी खाते उघडतेवेळीच घोषणापत्राद्वारे नामनिर्देशनाचा किंवा नामनिर्देशन रद्द करणे यापैकी एक पर्याय स्वीकारलेला आहे.