मुंबई : भांडवली बाजार नियामक सेबीने गुंतवणूकदारांमधील आर्थिक साक्षरता वाढावी यासाठी प्रमाणपत्र परीक्षा सुरू केली आहे. ही परीक्षा ऑनलाइन माध्यमातून नि:शुल्क पार पडेल, शिवाय संलग्न अभ्यास सामग्री देखील परीक्षार्थी विनामूल्य मिळवू शकतील. भांडवली बाजारात व्यवहार करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीबद्दल सर्वसमावेशक ज्ञान मिळण्यास ही परीक्षा मदतकारक ठरेल.

हेही वाचा >>> एसबीआय म्युच्युअल फंडाची मालमत्ता विक्रमी १० लाख कोटींवर

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sebi launches a certification course for investors print eco news zws