scorecardresearch

Premium

त्रिशतकी झेप घेत ‘सेन्सेक्स’चा सप्ताहाला निरोप

अमेरिका आणि युरोपातील सकारात्मक कलामुळे देशाअंतर्गत आघाडीवर प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने शुक्रवारी तीन शतकी झेप घेतली.

Sensex bids farewell to the week
त्रिशतकी झेप घेत ‘सेन्सेक्स’चा सप्ताहाला निरोप (image – indian express/file photo)

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : अमेरिका आणि युरोपातील सकारात्मक कलामुळे देशाअंतर्गत आघाडीवर प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने शुक्रवारी तीन शतकी झेप घेतली. धातू, वित्त आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेल्या चौफेर खरेदीने बाजारात चैतन्याचे वातावरण होते.

indri diwali collectors edition 2023 whisky
भारताची ‘ही’ दारू संपूर्ण जगात पहिल्या क्रमांकावर, काय आहे किंमत?
Evergrande
विश्लेषण : चीनचे दोलायमान गृहनिर्माण क्षेत्र जगाला आर्थिक अडचणीत आणणार का? ‘एव्हरग्रांद’ प्रकरण काय आहे?
ukrain attack
अन्वयार्थ : युक्रेनची नवी ‘आघाडी’..
Giorgia Meloni
इटली BRI प्रकल्पातून बाहेर पडणार? चीनला फटका? जाणून घ्या…

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ३२०.०९ अंशांची भर पडून ६५,८२८.४१ वर स्थिरावला. दिवसभरात तो ६४३.३३ अंशांनी झेपावला होता आणि त्याने ६६,१५१.६५ ही सत्रातील उच्चांकी पातळी गाठली होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ११४.७५ अंशांची वाढ झाली आणि तो १९,६३८.३० पातळीवर स्थिरावला.

हेही वाचा – वेदान्त समूहातील व्यवसायांचे विलगीकरण; पाच नवीन सूचिबद्ध कंपन्या उदयास येणार

हेही वाचा – कच्च्या तेलावर विंडफॉल कर वाढला, एटीएफ आणि डिझेलवरील निर्यात शुल्क केले कमी

सेन्सेक्समध्ये, एनटीपीसीचा समभाग ३ टक्क्यांहून अधिक वधारला. त्यापाठोपाठ टाटा मोटर्स, सन फार्मा, टाटा स्टील, स्टेट बँक, अल्ट्राटेक सिमेंट, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज फायनान्स, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक आणि इंडसइंड बँक यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. तर पॉवर ग्रिड, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टेक महिंद्र, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस आणि टायटनच्या समभागात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराने दिलेल्या माहितीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) गुरुवारच्या सत्रात ३,३६४.२२ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.

बाजार आकडेवारी

सेन्सेक्स ६५,८२८.४१ ३२०.०९ ०.४९

निफ्टी १९,६३८.३० ११४.७५ ०.५९

डॉलर ८३.०५ – १४

तेल ९५.२८ – ०.४९

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sensex bids farewell to the week with a three hundred leap print eco news ssb

First published on: 30-09-2023 at 11:24 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×