मुंबई : परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून होणारी समभाग विक्री आणि त्यातच आता महागाईच्या उडालेल्या भडक्याने गुंतवणूकदार अधिक चिंतातुर झाले आहेत. परिणामी सलग तिसऱ्या सत्रात प्रमुख निर्देशांकांमध्ये घसरण कायम आहे. खाद्यान्न, विशेषत: भाजीपाला आणि उत्पादित वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे घाऊक महागाईचा दर ऑक्टोबरमध्ये २.३६ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर किरकोळ महागाई दरानेदेखील रिझर्व्ह बँकेची उच्च सहनशील पातळी ओलांडत ऑक्टोबरमध्ये तो ६.२१ टक्क्यांची पातळी गाठली आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ११०.६४ अंशांनी घसरून ७७,५८०.३१ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने २६६.१४ अंश गमावत ७७,४२४.८१ ही सत्रातील नीचांकी पातळी गाठली होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २६.३५ अंशांची घसरण झाली. तो २३,५३२.७० अंशांवर स्थिरावला. सलग सहाव्या सत्रात निफ्टीमध्ये घसरण झाली आहे.

public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
Indraprastha Gas Limited bonus shares
इंद्रप्रस्थ गॅसकडून बक्षीस समभाग
s and p global ratings
अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहणार – एसअँडपी; नवीन वर्षात मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर दिलासा शक्य
t Plus zero transaction system
आघाडीच्या ५०० कंपन्यांमध्ये ३१ डिसेंबरपासून ‘टी प्लस शून्य’ व्यवहार प्रणाली
amazon smbhav 2024 nitin gadkari
देशातील वाहतूक खर्च निम्म्यावर आणणार – नितीन गडकरी
jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
jsw e cars marathi news
‘जेएसडब्ल्यू‘कडून सात लाख ई-मोटार निर्मितीचे उद्दिष्ट, प्रस्तावित प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून मंजुरी
rbi governor shaktikanta das
उच्च व्याजदर केवळ विकासदर मंदावण्याचे कारण नव्हे – दास

हेही वाचा >>> चलनवाढीसह विकासवेग मंदावण्याचा धोका ; शक्तिकांत दास

देशांतर्गत आघाडीवर भांडवली बाजारात निराशाजनक वातावरण असले तरी सत्रांतर्गत अस्थिरता कमी झाली आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून समभाग विक्री कायम आहे. मात्र सकारात्मक बाब म्हणजे, त्यांचा विक्रीचा माराही कमी झाला असल्याने बाजारातील घसरण मर्यादित राहिली, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

आज बाजार-व्यवहार बंद

शुक्रवारी गुरू नानक जयंतीमुळे सार्वजनिक सुट्टी असल्याने मुंबई तसेच राष्ट्रीय अशा दोन्ही शेअर बाजारात व्यवहार होणार नाहीत. पुढील आठवड्यात बुधवारी (२० नोव्हेंबर) राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याने त्या पूर्ण दिवसातही बाजारात व्यवहार होणार नाहीत.

देशांतर्गत गुंतवणूकदार सरसावले

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) समभाग विक्रीचा मारा सुरू ठेवला आहे. दुसरीकडे मात्र देशांतर्गत गुंतवणूकदार खरेदीसाठी सरसावले आहेत. बुधवारी एफआयआयने २,५०५.५८ कोटी रुपये मूल्याचे समभाग विकले, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी त्या तुलनेत तिप्पट म्हणजेच ६,१४५.२४ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले. सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर, एनटीपीसी, नेस्ले, इंडसइंड बँक, पॉवर ग्रिड, अदानी पोर्ट्स, टाटा मोटर्स आणि बजाज फिनसर्व्ह यांच्या समभागांमध्ये घसरण झाली. तर रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक महिंद्र बँक, टेक महिंद्र, महिंद्र अँड महिंद्र आणि एचडीएफसी बँकेचे समभाग तेजीत होते.

Story img Loader