मुंबई: परदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा सपाटा सुरू राहिल्याने भांडवली बाजारात पडझड कायम असून मंगळवारच्या सत्रात सेन्सेक्स ९३० अंशांच्या घसरणीसह दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरला. निफ्टीने देखील २४,५०० अंशांची महत्त्वाची पातळी मोडली असून त्यात ३०९ अंशांची घसरण झाली.

मंगळवारच्या सत्रात समभाग विक्रीच्या माऱ्यामुळे सलग दुसऱ्या सत्रात प्रमुख निर्देशांक १ टक्क्याहून अधिक गडगडले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ९३०.५५ अंशांनी म्हणजेच १.१५ टक्क्यांनी घसरून ८०,२२०.७२ पातळीवर स्थिरावला. विद्यमान वर्षात १४ ऑगस्टला नोंदवलेल्या नीचांकी पातळीवर त्याने पुन्हा फेर धरला आहे. दिवसभरात, त्याने १००१.१४ अंश गमावत ८०,४९५.४९ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३०९ अंशांची घसरण झाली तो २४,४७२.१० पातळीवर बंद झाला.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा >>> Gold & Silver Prices Surge : चांदी लाखमोलाची; सोन्याची आगेकूच सुरूच

कंपन्यांची सरलेल्या दुसऱ्या तिमाहीतील घसरलेली कमाई आणि बिघडलेल्या जागतिक भू-राजकीय स्थितीमुळे गुंतवणूकदारांच्या भावनेवर परिणाम झाला. अमेरिकी रोख्यांवरील वाढते परतावा उत्पन्न आणि चीनच्या धोरणात्मक कृतीमुळे परदेशी गुंतवणूकदार देशांतर्गत भांडवली बाजारातून बाहेर पडत आहेत.

वाढलेल्या अस्थिरतेसह देशांतर्गत बाजारात मंदीच्या भावना कायम राहिल्या, व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्मॉल आणि मिडकॅप कंपन्यांच्या समभागांना सर्वाधिक फटका बसला. अमेरिकी रोख्यांवरील परतावा दर वाढल्याने अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडरल रिझर्व्हकडून आक्रमक दर कपातीची शक्यता कमी झाली आहे. ज्यामुळे उदयोन्मुख देशांच्या भांडवली बाजारातील निधी प्रवाहावरही परिणाम झाला आहे. अल्पावधीत, नफावसुली झाल्यामुळे बाजारातील निराशाजनक वातावरणामुळे हा मंदीचा दृष्टिकोन कायम राहू शकतो, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांमध्ये महिंद्र अँड महिंद्र, स्टेट बँक, पॉवर ग्रिड, टाटा स्टील, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, लार्सन ॲण्ड टुब्रो, एनटीपीसी, बजाज फायनान्स आणि रिलायन्स या कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी चौफेर विक्रीचा मारा केला. तर या पडझडीत देखील आयसीआयसीआय बँक, नेस्ले आणि इन्फोसिस या कंपन्यांची कामगिरी चमकदार राहिली.

सेन्सेक्स ८०,२२०.७२ -९३०.५५ -१.१५%

निफ्टी २४,४७२.१० – ३०९ -१.२५%

डॉलर ८४.०७ १ पैसा

तेल ७४.७४ ०.६१

Story img Loader