‘फेड’च्या व्याजदर कपातीनंतर सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी बघायला मिळत आहे. सेन्सेक्सने आजही १००० अकांनी वाढून विक्रमी उच्चांक गाठला आहे. आज दुपारी सेन्सेक्स ८४ हजार १७२.८७ पर्यंत पोहोचला. याशिवाय निफ्टीतही १.१६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. निफ्टी २५ हजारांच्या पार पोहोचला आहे. त्यामुळे गुंतवणूक दारांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.

आज सकाळी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये ४३९.७५ अंकांची वाढ दिसून आली होती. याशिवाय निफ्टीमध्येही १३२.०५ अंकांची वाढ झाल्याचं बघायला मिळालं होतं. या वाढीसह आज सकाळी मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स ८३ हजार ६२४.५५ तर निफ्टी २५ हजार ५४७.८५ वर पोहोचला होता. आता दुपारी पुन्हा एकदा सेन्सेक्सने उसळी घेतली आहे.

What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
supreme court telecom companies marathi news
दूरसंचार कंपन्यांना थकीत देणींबाबत दिलासा नाहीच!
Akshay Shinde Encounter Case Bombay High Court Hearing Updates in Marathi
Mumbai High Court on Akshay Shinde Encounter Case : “अक्षयने पिस्तुल लोड कशी केली? मी १०० वेळा…”, उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी पोलीस आणि सरकारी वकिलांना सुनावलं!
Jammu & Kashmir Election Results 2024
Jammu and Kashmir Assembly Election Result 2024 : जम्मू-काश्मीरची सत्ता मिळवली, कलम ३७० बाबत आता कोणती भूमिका? ओमर अब्दुल्ला म्हणाले…
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
Sarpanch Upasarpanch Salary
Sarpanch Salary Hike : सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ; राज्य सरकारचे २४ मोठे निर्णय
Who killed Akshay Shinde Encounter Badlapur Sexual Assault Case Update in Marathi
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस अधिकारी कोण? चकमकफेम प्रदीप शर्मांबरोबर केलं होतं काम

हेही वाचा – कोहिनूर, एलटी फूड्सचे समभाग तेजीत, केंद्र सरकारने बासमती तांदळावरील निर्यात मूल्य हटविल्याचा फायदा

दरम्यान, गुरुवारी अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने चार वर्षांहून अधिक कालावधींनंतर व्याजदर कपात करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टीने उच्चांक गाठल्याचे बघायला मिळालं होतं. दिवसअखेर मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स २३६.५७ अंकांनी वधारून ८३,१८४.८० या सर्वकालीन उच्चांकावर स्थिरावला. दिवसभरात, त्याने ८२५.३८ अंकांची उसळी घेत ८३,७७३.६१ हे ऐतिहासिक शिखर गाठले होते. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३८.२५ अंकांची वाढ होत, तो २५,४१५.८० पातळीवर स्थिरावला होता. त्याने देखील २५,६११.९५ या ऐतिहासिक उच्चांकाला स्पर्श केला होता.

हेही वाचा – Bajaj Housing Finance share: बजाज हाऊसिंग फायनान्सचा शेअर मिळाला तर गुंतवणूकदार होऊ शकतात मालामाल; वाचा कधी लिस्टिंग होणार?

महत्त्वाचे म्हणजे ‘फेड’ने यावेळी अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे अर्ध्या टक्क्याची व्याजदर कपात केल्याने तसेच भविष्यातही व्याजदरात कपातीचे संकेत दिल्याने शेअर बाजारातील तेजी बघायला मिळत असल्याचे बोललं जात आहे. विशेष म्हणजे केवळ भारतातीलच नव्हे तर अमेरिकेपासून जपानपर्यंत विविध शेअर मार्केटमध्ये तेजीचे वारे वाहू लागले आहेत.