मुंबई : आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांच्या उत्तराधिकारी ठरवण्याच्या योजनेवर भागधारकांनी शुक्रवारी शिक्कामोर्तब केले आहे. ऑगस्ट महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळावर त्यांनी ईशा अंबानी पिरामल, आकाश आणि अनंत या तिन्ही मुलांच्या निवडीची घोषणा अंबानी यांनी केली होती, त्या प्रस्तावावर झालेल्या ई-मतदानांत भागधारकांनी बहुमताने कौल दिला.

आकाश आणि ईशा यांना संचालक मंडळातील जागेसाठी ९८ टक्क्यांहून अधिक भागधारकांची पसंतीची मते मिळाली. तर मुकेश अंबानी यांचे कनिष्ठ पुत्र अनंत अंबानी, यांचे वय आणि कामाचा अनुभव कमी असल्याने त्यांच्या नियुक्तीला सल्लागार संस्थांनी विरोध केला होता. परिणामी आकाश आणि ईशा यांच्या तुलनेत त्यांना कमी म्हणजेच ९२.७ टक्के मते मिळवण्यात यश आले, अशी माहिती कंपनीने बाजारमंचांना शुक्रवारी दिली.

farmers displeasure hit in lok sabha elections say cm eknath shinde confession
लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका ; मुख्यमंत्र्यांची कबुली; कांदा, दूध, कापसाच्या दरांवरून रोष भोवला
loksatta editorial on ekanth shinde and ajit camps disappointment over the allocation of cabinet berths
अग्रलेख : उपयोगशून्यांची उपेक्षा!
Narendra Modi Oath Ceremony 2024
अबकी बार…’एनडीए’ सरकार! सेंट्रल हॉलमधील ४८ मिनिटांच्या भाषणात मोदींकडून ३९ वेळा ‘एनडीए-गठबंधन’ शब्दांचा उल्लेख!
Vijay Wadettivar on Eknath Shinde drought
“मुख्यमंत्र्यांच्या गुरांना हिरवा चारा आणि शेतकऱ्यांच्या गुरांना…”, एकनाथ शिंदेंचा व्हिडीओ शेअर करत वडेट्टीवारांची टीका
sugarcane, Raju Shetty,
मागील हंगामातील उसाचे प्रतिटन १०० रुपये द्या – राजू शेट्टी यांची मागणी; आचारसंहितेनंतर बैठकीचे आयोजन – पालकमंत्री मुश्रीफ
Rajeev Jain GQG investment in Adani shares at 83111 crores
राजीव जैन यांच्या ‘जीक्यूजी’ची अदानींच्या समभागातील गुंतवणूक ८३,१११ कोटींवर; वर्षभरात १५० टक्क्यांची वाढ
Allegations, recovery,
पालकमंत्र्यांवर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप, आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावर ५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
swati maliwal assault case
स्वाती मालिवाल यांच्या तक्रारीनंतर बिभव कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

हेही वाचा : टाटांकडून देशात आयफोनचे उत्पादन, बंगळूरुनजीक ‘विस्ट्रॉन’ प्रकल्पाचे संपादन मार्गी

आतापर्यंत मुकेश अंबानी यांची तिन्ही मुले रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळात नव्हती. ती केवळ काही कंपन्यांचे व्यावसायिक कामकाज सांभाळत होती. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेआधी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ईशा, आकाश आणि अनंत यांची बिगर-कार्यकारी संचालक म्हणून निवडीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. अंबानी यांची तिन्ही मुले समूहातील इतर कंपन्यांच्या संचालक मंडळात आहेत. आता ती पहिल्यांदाच पालक कंपनीच्या संचालक मंडळात दाखल झाली आहेत. याचबरोबर मुकेश अंबानी यांना एप्रिल २०२९ पर्यंत आणखी ५ वर्षे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक या पदावर कायम राहणार आहेत.

ईशाला तिच्या नियुक्तीच्या बाजूने ९८.२१ टक्के आणि विरोधात केवळ १.७८ टक्के मते मिळाली आहेत. आकाशच्या बाजूने ९८.०५ टक्के आणि विरोधात १.९४ टक्के मते पडली. तर अनंत यांना ९२.७५ टक्के अनुकूल मते मिळाली. मात्र ४१.५८ कोटी म्हणजेच ७.२४ टक्के लोकांनी त्यांच्या नियुक्तीच्या विरोधात मतदान केले.

हेही वाचा : ईशा, आकाश आणि अनंत अंबानी रिलायन्सच्या बोर्डात होणार सामील, ९० टक्के भागधारकांकडून मंजुरी

इन्स्टिट्यूशन शेअरहोल्डर सर्व्हिसेस (आयएसएस) ही आंतरराष्ट्रीय सल्लागार संस्था आणि मुंबईस्थित इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर ॲडव्हायजरी सर्व्हिसेस (आयआयएएस) या दोन संस्थांनी रिलायन्सच्या भागधारकांना ई-मतदानाच्या माध्यमातून अनंत अंबानी यांच्या संचालक मंडळातील प्रवेशाला विरोध करण्याची भूमिका घेण्याची शिफारस केली होती. त्यात त्यांनी अनंत अंबानी यांचे वय कमी असल्याचा आणि अनुभव नसल्याचा मुद्दा उपस्थित करून, त्यांना रिलायन्स संचालक मंडळात स्थान मिळू नये अशी भूमिका घेतली होती.

कोणाकडे काय जबाबदारी?

मुकेश अंबानी हे ६६ वर्षांचे आहेत. मागील वर्षी त्यांचे पुत्र ३१ वर्षीय आकाश अंबानी यांची रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. जिओ इन्फोकॉम ही जिओ प्लॅटफॉर्म्सची उपकंपनी आहे. त्यात मेटा आणि गूगल यांची हिस्सेदारी असून, तिचे अध्यक्षपद मुकेश अंबानी यांच्याकडेच आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही जिओ प्लॅटफॉर्म्सची पालक कंपनी आहे. आकाशची जुळी बहीण ईशा यांच्यावर रिलायन्स रिटेल या किराणा क्षेत्रातील व्यवसायाची जबाबदारी सोपविण्यात आली. अंबानी यांचे सर्वांत कनिष्ठ पुत्र २८ वर्षीय अनंत यांच्याकडे ऊर्जा व्यवसायाची धुरा देण्यात आली.