scorecardresearch

सोटॅक फार्मास्युटिकल्सची ३३.३० कोटींची प्रारंभिक भागविक्री बुधवारपासून

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या लघू व मध्यम कंपन्यांसाठी स्थापित ‘एनएसई इमर्ज’ बाजारमंचावर समभागांच्या सूचिबद्धतेसाठी असलेल्या या आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना २९ मार्च ते ३ एप्रिल या दरम्यान बोली लावता येणार आहे.

Sotac Pharmaceuticals Ltd, IPO
सोटॅक फार्मास्युटिकल्सची ३३.३० कोटींची प्रारंभिक भागविक्री बुधवारपासून ( Photo – ANI )

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबईः अनेक बड्या औषधी आणि पोषणपूरक उत्पादनांच्या निर्मात्यांसाठी उच्च गुणवत्तेचे कंत्राटी पद्धतीने उत्पादन घेणारी अहमदाबादस्थित कंपनी सोटॅक फार्मास्युटिकल्स लिमिटेडने प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून ३३.३० कोटी रुपये उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या लघू व मध्यम कंपन्यांसाठी स्थापित ‘एनएसई इमर्ज’ बाजारमंचावर समभागांच्या सूचिबद्धतेसाठी असलेल्या या आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना २९ मार्च ते ३ एप्रिल या दरम्यान बोली लावता येणार आहे.

सोटॅक फार्मा आणि तिच्या उपकंपनीचे साणंद, गुजरात येथे दोन स्वतंत्र उत्पादन प्रकल्प कार्यरत असून, भागविक्रीतून उभारल्या जाणाऱ्या निधीचा वापर हा उपकंपनीमध्ये गुंतवणूक, प्रस्थापित प्रकल्पाच्या ठिकाणी इमारतींचा विस्तार आणि अद्ययावतीकरण तसेच खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी केला जाणार आहे. गुंतवणूकदारांना प्रत्येकी १०५ रुपये ते १११ रुपये या दरम्यान कंपनीच्या समभागांसाठी बोली लावता येईल. हा एसएमई बाजारमंचावर सूचिबद्धतेसाठी आयपीओ असल्याने गुंतवणूकदारांना किमान १,२०० समभागांच्या निश्चित संचासाठी आणि त्यापुढे १,२०० समभागांच्या पटीत अर्ज दाखल करावा लागेल. बीलाइन कॅपिटल ॲडव्हायजर्स या भागविक्रीचे व्यवस्थापन पाहत असून, केफिन टेक्नॉलॉजीजची निबंधक म्हणून भूमिका असेल.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 11:40 IST

संबंधित बातम्या