मुंबई : रिझर्व्ह बँकेचा स्थापनेपासूनचा ९० वर्षांचा प्रवास आता वेबमालिकेच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे. स्टार इंडियाकडून या वेबमालिकेची निर्मिती केली जाणार असून, देशाच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत मध्यवर्ती बँकेचे असलेले योगदान सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश यामागे आहे.

रिझर्व्ह बँकेची स्थापना १९३५ मध्ये झाली. या वर्षी एप्रिल महिन्यात बँकेने ९० वर्षे पूर्ण केली. रिझर्व्ह बँकेच्या ९० वर्षांच्या या प्रवासावर वेबमालिका बनविण्यासाठी बँकेने प्रस्ताव मागविले होते. स्टार इंडिया, व्हायकॉम १८, झी एंटरटेन्मेंट नेटवर्क आणि डिस्कव्हरी कम्युनिकेशन्स इंडिया या निर्मिती व प्रसारण गृहांनी यासाठी प्रस्ताव दाखल केले होते. झी एंटरटेन्मेंट आणि डिस्कव्हरी कम्युनिकेशन्स इंडिया या कंपन्या तांत्रिक मुद्द्यावर अपात्र ठरल्या. त्याचवेळी स्टार इंडिया आणि व्हायकॉम १८ चे प्रस्ताव अंतिम फेरीत विचारार्थ होते. अखेर रिझर्व्ह बँकेने वेबमालिका बनविण्याचे हे ६.५ कोटी रुपयांचे काम स्टार इंडियावर सोपवले आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा >>> स्पर्धा आयोगाकडून चौकशीवर अंतिम निवाडा आला नसल्याचा दावा

रिझर्व्ह बँकेच्या प्रस्तावानुसार, पाच भागांची वेबमालिका बनविली जाणार आहे. प्रत्येक भाग हा २५ ते ३० मिनिटांचा असेल. ही वेबमालिका राष्ट्रीय दूरचित्रवाणी वाहिन्या अथवा ओटीटी मंचावर प्रसारित केली जाईल. रिझर्व्ह बँकेचा ९० वर्षांचा प्रवास या वेबमालिकेच्या माध्यमातून अधोरेखित केला जाईल.

वेबमालिकेत काय?

रिझर्व्ह बँकेचा ९० वर्षांचा प्रवास उलगडणाऱ्या या वेबमालिकेत, मध्यवर्ती बँकेचे ध्येय आणि धोरणे मांडण्यात येतील. बँकेच्या इतिहासातील मैलाचे टप्पे आणि विकासाचे टप्पेही दाखविण्यात येतील. बँकेचा प्रवास एका कथानकात गुंफला जाईल. त्यासोबतच तज्ज्ञांच्या मुलाखती आणि सामान्य नागरिकांना वित्तीय संकल्पना समजतील अशा पद्धतीने वेबमालिकेची मांडणी असेल.

Story img Loader