Premium

स्टेट बँक ५०,००० कोटींचा निधी उभारणार

स्टेट बँकेने सरलेल्या मार्च तिमाहीत विक्रमी १८,०९४ कोटी रुपयांचा नफा मिळविला आहे. तर मार्चअखेर सरलेल्या संपूर्ण वर्षात नफ्यात ५८ टक्क्यांची वाढ नोंदवत तो ५०,२३२ कोटी रुपयांवर नेला आहे.

sbi
SBI च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने देशांतर्गत आणि परदेशातील बाजारांमधून कर्ज रोख्यांच्या माध्यमातून ५०,००० कोटी रुपयांचा निधी उभारणार असल्याची शुक्रवारी माहिती दिली. स्टेट बँकेच्या संचालक मंडळाने रुपये किंवा इतर कोणत्याही परिवर्तनीय चलनामध्ये निधी उभारण्यास मान्यता दिली आहे. बँक बॅसल ३, अतिरिक्त टियर १ बाँड्स, टियर २ बाँड्स आणि इतर खासगी कंपन्यांना रोखे विक्रीतून हा निधी उभारणार आहे, अशी माहिती स्टेट बँकेने बाजार मंचांना दिली.

स्टेट बँकेने सरलेल्या मार्च तिमाहीत विक्रमी १८,०९४ कोटी रुपयांचा नफा मिळविला आहे. तर मार्चअखेर सरलेल्या संपूर्ण वर्षात नफ्यात ५८ टक्क्यांची वाढ नोंदवत तो ५०,२३२ कोटी रुपयांवर नेला आहे. हा आतापर्यंत बँकेने मिळविलेला सर्वोच्च तिमाही आणि वार्षिक नफा आहे. SBI ने आपल्या संशोधन अहवाल ‘Ecowrap’ मध्ये म्हटले आहे की, एप्रिल २०२३ पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या GDP अंदाजात काही बदल झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचाः मे महिन्यात ‘इक्विटी’ फंडातील गुंतवणुकीत घसरण; पण ‘SIP’च्या माध्यमातून योगदान १४,७४८.६८ कोटींच्या विक्रमी पातळीवर

आरबीआयने एप्रिलमध्ये २०२३-२४ साठी जीडीपी वाढीचा दर ६.४ टक्के असा अंदाज व्यक्त केला होता, परंतु गुरुवारी सादर केलेल्या ताज्या पतधोरणात तो ६.५ टक्क्यांवर थोडा सुधारला. या कालावधीत चलनवाढीचा दर ५.१ टक्के राहण्याचा अंदाज आहे, जो आरबीआयच्या चार टक्क्यांच्या सहनशीलतेपेक्षा जास्त आहे. हवालानुसार, पॉलिसी व्याजदरातील अनेक वाढीमुळे बेरोजगारीच्या दरात घट झाली आहे. त्यामुळे मध्यवर्ती बँक रोजगारात आकुंचन न आणता बाजारातील अतिरिक्त कामगार मागणी कमी करण्यास सक्षम असल्याचंही स्पष्ट होत आहे.

हेही वाचाः १२००० रुपयांच्या कर्जातून व्यवसायाला सुरुवात अन् आज २.५ लाख कोटींची कंपनी स्थापून जगाला विकतोय सोनं, कोण आहेत राजेश मेहता?

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-06-2023 at 20:25 IST
Next Story
Avenue Supermartsमुळे आर. के. दमाणी यांचे नशीब पालटले, अव्वल अब्जाधीशांमध्ये सामील