scorecardresearch

Premium

बिहारमधून मुंबईत आले, अनेक धक्के खाल्ले आणि आज ४५ हजार कोटींच्या कंपनीचे मालक, कोण आहेत बासुदेव सिंग?

success story basudeo narayan singh : ही यशोगाथा आहे ८३ वर्षीय बासुदेव सिंग यांची, जे अग्रगण्य फार्मा कंपनी अल्केम लॅबचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. या कंपनीचे बाजार मूल्य सध्या ४५००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, परंतु ती ५ लाख रुपयांपासून सुरू झाली.

success story basudeo narayan singh
(फोटो क्रेडिट- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

success story basudeo narayan singh : तुम्ही अशा अनेक कथा ऐकल्या असतील, ज्यात एक सामान्य माणूस यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. छोटे शहर सोडल्यानंतर काहींनी दिल्लीत तर काहींनी मुंबईत आपले नशीब आजमावले. विशेषतः मुंबई चित्रपट आणि व्यवसाय या दोन्हीसाठी ओळखली जाते. मायानगरीने देशाला अनेक उद्योगपती आणि अनेक सुपरस्टार दिले. आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीची यशोगाथा सांगणार आहोत, ज्याने मुंबईत पोहोचल्यानंतर इंडस्ट्रीत आपले नाव कमावले. ही यशोगाथा आहे ८३ वर्षीय बासुदेव सिंग यांची, जे अग्रगण्य फार्मा कंपनी अल्केम लॅबचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. या कंपनीचे बाजार मूल्य सध्या ४५००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, परंतु ती ५ लाख रुपयांपासून सुरू झाली.

हेही वाचाः गौतम अदाणी टॉप २० श्रीमंतांच्या यादीत सामील, एका आठवड्यात संपत्ती १० अब्ज डॉलरने वाढली

ravi pandit marathi news, kp group ravi pandit marathi news, kpit technologies ravi pandit marathi news, kp pandit loksatta article marathi news
वर्धापनदिन विशेष: ध्यासमग्न उद्योगपती… रवी पंडित
GP Parsik Coop Bank new CEO vikram patil
जीपी पारसिक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी विक्रम पाटील; व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी केसरीनाथ घरत
vibhor steel tubes make bumper debuts at a premium of 181 percent over issue price
विभोर स्टील ट्यूबचे दमदार पदार्पण; गुंतवणूकदारांना १९३ टक्क्यांच्या बहुप्रसवा परतावा
confidence petroleum bw lpg jv to invest rs 650 crores in jnpt for new lpg terminal
जेएनपीटीमध्ये ६५० कोटींच्या गुंतवणुकीतून नवीन एलपीजी टर्मिनल; नॉर्वेस्थित बीडब्ल्यू एलपीजीशी भागीदारीतून ‘कॉन्फिडन्स पेट्रोलियम’ची योजना

बिहारमध्ये व्यवसाय सुरू केला अन् नंतर मुंबई गाठली

मुंबईपासून दूर असलेल्या बिहारमध्ये राहणारे बासुदेव सिंग एकेकाळी प्राध्यापक होते. पण उद्योगपती होण्याचे त्यांचे स्वप्न होते, म्हणून त्यांनी नोकरी सोडून भावाबरोबर व्यवसाय सुरू केला. त्यांनी आणि त्यांच्या भावाने १९६२ मध्ये त्यांच्या गावी फार्मा वितरण व्यवसायात नशीब आजमावले. या व्यवसायात यश मिळाल्यानंतर दोन्ही भावांनी स्वत:ची फार्मा कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचाः महागडा कांदा अन् टोमॅटोचा शाकाहारींच्या खिशावर परिणाम, नोव्हेंबरमध्ये व्हेज थाळी महागली

एका औषधाने नशीब बदलले

फोर्ब्सला दिलेल्या मुलाखतीत बासुदेव सिंह यांनी सांगितले की, ते त्यांची फार्मा कंपनी सुरू करण्यासाठी केवळ ५ लाख रुपये घेऊन मुंबईत आले होते. हे इतके सोपे नसले तरी बासुदेव सिंग यांनी दृढनिश्चय केला होता. अखेर अनेक प्रयत्नांनंतर दोन्ही भावांनी मिळून १९७३ मध्ये अल्केम लॅबोरेटरीजची स्थापना केली. फक्त ११ वर्षांनंतर १९८४ मध्ये कंपनीने १० कोटी रुपयांचा महसूल मिळवला. Alkem Laboratories ला दीर्घ काळानंतर मोठे यश मिळाले, जेव्हा कंपनीने Taxim नावाचे औषध बाजारात आणले, ज्याचा उपयोग विविध प्रकारच्या जीवाणूंच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी केला जातो. भारतात १०० कोटी रुपयांची वार्षिक विक्री करणारे Taxim हे पहिले अँटी बॅक्टेरियल औषध ठरले आहे. यामुळे २००८ पर्यंत १००० कोटी रुपयांचा महसुलाचा आकडा पार करण्यात कंपनीला यश आले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Success story basudeo narayan singh who built 45 crore company with 5 lakh know net worth vrd

First published on: 06-12-2023 at 17:13 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×