मुंबई : टाटा समूहाची दागिने निर्मिती क्षेत्रातील लोकप्रिय नाममुद्रा असलेल्या ‘तनिष्क’ने बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेला सदिच्छा दूत म्हणून करारबद्ध केल्याचे गुरुवारी घोषित केले. याबरोबरच बहुप्रतिक्षित ‘फेस्टिव्हल ऑफ डायमंड्स’ मोहिमेला कंपनीने सुरुवात केली.
नैसर्गिक हिऱ्यांच्या दागिन्यांचा देशातील सर्वात मोठा ब्रँड असलेल्या तनिष्कच्या ‘फेस्टिव्हल ऑफ डायमंड्स’च्या मोहिमेत आधुनिक दैनंदिन वापराच्या दागिन्यांपासून ते खास स्टेटमेंट पीसेसपर्यंतच्या विस्तृत हिऱ्यांच्या दागिन्यांचा समावेश आहे. या वर्षी, हा उत्सव आधुनिक, बहुपयोगी आणि डिझाइन-आधारित दैनंदिन नैसर्गिक हिऱ्यांच्या दागिन्यांमध्ये तनिष्कचे नेतृत्व पुन्हा एकदा अधोरेखित करेल, जे आत्मविश्वास आणि सहजतेने स्वतःला व्यक्त करणाऱ्या महिलांसाठी तयार केले आहेत. यामध्ये १०,००० हून अधिक हिऱ्यांच्या डिझाइन्स सादर करण्यात आले आहे. अगदी १०,००० रुपयांपासून पुढे सुरू होणाऱ्या डिझाइन्स आणि हिऱ्यांच्या मूल्यावर सरसकट २० टक्के सूट देण्यात आली आहे. या मोहिमेत अनन्या पांडेचा सहयोग आधुनिकता, अभिव्यक्ती आणि आभूषणांच्या प्रासंगिकतेवर ‘तनिष्क’चा वाढता प्रभाव प्रतिबिंबित करेल. शिवाय आजच्या आत्मविश्वासू, स्टायलिश आणि आधुनिक विचारांच्या महिलांसह विविध श्रेणी आणि प्रसंगी नाते ते दृढ करणारे ठरेल.
तनिष्कने नेहमीच पिढ्यानपिढ्या महिलांची साथसंगत केली आहे, असे अनन्या पांडे म्हणाली. तर ही मोहीम म्हणजे आनंदोत्सव आहे, असे टायटन कंपनी लिमिटेडच्या मुख्य विपणन अधिकारी पेल्की त्शेरिंग म्हणाल्या.
