फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतात उपस्थित होते. मॅक्रॉन यांच्या या भेटीत भारत आणि फ्रान्स यांच्यात संरक्षण औद्योगिक भागीदारी ‘रोडमॅप’वर सहमती झाली आहे. दरम्यान, टाटा आणि एअरबस हेलिकॉप्टरने H125 हेलिकॉप्टरच्या निर्मितीसाठी भागीदारी केली आहे. एअरबस हेलिकॉप्टरने ट्विट करून याची माहिती दिली. याशिवाय उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी न्यू स्पेस इंडिया लिमिटेड आणि फ्रान्सच्या एरियनस्पेस यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एअरबस हेलिकॉप्टरने केले ट्विट, H125 हेलिकॉप्टर २०२६ पासून हवेत उडणार

Airbus Helicopters ने ट्विट केले की, ‘आम्ही देशात हेलिकॉप्टर फायनल असेंब्ली लाइन (FAL) तयार करण्यासाठी टाटा समूहाबरोबर भागीदारी जाहीर केली आहे. FAL भारतासाठी आमचे सर्वाधिक विकले जाणारे सिव्हिल हेलिकॉप्टर H125 तयार करेल आणि काही शेजारील देशांना निर्यात करेल.” FAL ला तयार होण्यासाठी २४ महिने लागतील आणि पहिल्या ‘मेड इन इंडिया’ H125 ची डिलिव्हरी २०२६ मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. FAL चा निर्णय एअरबस आणि टाटा समूह संयुक्तपणे घेणार आहेत.

हेही वाचाः ८ लाखांपर्यंतच्या पगारावर कोणताही कर लागणार नाही का? बजेटमध्ये मिळू शकते आनंदाची बातमी!

हेही वाचाः गौतम अदाणी धारावीच्या कायापालटासाठी पूर्णतः तयार, आता फक्त फेब्रुवारीची प्रतीक्षा

माउंट एव्हरेस्टवर उतरणारे एकमेव हेलिकॉप्टर

H125 हे माऊंट एव्हरेस्टवर उतरणारे एकमेव हेलिकॉप्टर आहे. या हेलिकॉप्टरमध्ये सहा प्रवासी चढू शकतात. अति उष्मा आणि थंडीतही ते उडू शकते. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन म्हणाले, “खासगी क्षेत्रातील भारतातील पहिले हेलिकॉप्टर असेंब्ली सुविधा उभारताना टाटा समूहाला आनंद होत आहे. गुजरातमधील वडोदरा येथील ‘मेक इन इंडिया’ C295 लष्करी विमान निर्मिती सुविधेनंतर भारतात उत्पादित होणारी ही एअरबस दुसरी असेंब्ली लाइन आहे. काल रात्री जयपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यातील चर्चेचा तपशील जाहीर करताना परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा म्हणाले होते की, टाटा आणि एअरबस हेलिकॉप्टरने गंभीर स्वदेशी घटकांसह H125 हेलिकॉप्टर तयार करण्यासाठी भागीदारी केली आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata and airbus to build h125 helicopter in india to be the only helicopter to land on mount everest vrd
First published on: 26-01-2024 at 19:48 IST