Tata Consultancy Services: गेल्या काही दिवसांपूर्वीच कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम बंद केल्यानंतर आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने त्यांच्या २००० हून अधिक कर्मचाऱ्यांना बदलीची नोटीस पाठवली आहे. विशेष म्हणजे कंपनीने या सर्व कर्मचाऱ्यांना १५ दिवसांच्या आत बदली केलेल्या संबंधित ठिकाणी रुजू होण्यास सांगितले आहे, अशी माहिती आयटी कर्मचाऱ्यांची संघटना कर्मचारी युनियन नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट (NITES) ने दिली आहे. यापूर्वी टीसीएसने आपल्या निर्णयात कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच दिवस कार्यालयातून काम करणे बंधनकारक केले होते.

वेळेवर बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्यास कारवाई केली जाणार

मनी कंट्रोलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना मेलद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. येत्या दोन आठवड्यांत कर्मचाऱ्यांना ठराविक ठिकाणी रुजू व्हावे लागेल, असे या मेलमध्ये म्हटले आहे. असे न केल्यास कंपनी कर्मचाऱ्यांवर कारवाई करू शकते. याबरोबरच कर्मचाऱ्यांचा प्रवास आणि राहण्याचा खर्च कंपनी करणार असल्याचेही या मेल पत्रात म्हटले आहे. ऑगस्ट महिन्यापासूनच कर्मचाऱ्यांना हे मेल मिळू लागले आहेत.

Google Amazon Microsoft Meta Other Tech Companies Have Cut Jobs
२०२५ मध्ये टेक कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ? कारण काय? गुगल, मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांमध्ये का सुरू आहे नोकर कपात?
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
ॲमेझॉनच्या कामगारांचे काम बंद! पुण्यासह मुंबईतील ऑनलाइन सेवेला फटका बसणार
PMRDA flats to be auctioned by Chief Minister on Wednesday Pune news
पीएमआरडीएच्या सदन‍िकांची बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडत
infosys Layoffs
Infosys ने ४०० प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने काढून टाकले, सहा वाजेपर्यंत कँम्पस सोडण्याचे आदेश
pimpri chinchwad municipal corporation
पिंपरी : अठ्ठावीस वर्षांच्या लढ्याला यश; ‘या’ प्रकरणी ‘सर्वोच्च’ निकाल
Decision to pay salaries of municipal employees and officers based on biometric attendance
वेळ पाळा, तरच पूर्ण वेतन! का घेण्यात आला हा निर्णय ?
Chhatrapati Sambhajinagar, water , arrears ,
छत्रपती संभाजीनगरमध्ये नळजोडणीची १२१ कोटींची थकबाकी

हेही वाचाः महादेव अ‍ॅपच्या जाळ्यात डाबर समूहसुद्धा अडकला, ‘इतक्या’ जणांविरोधात गुन्हा दाखल

कर्मचाऱ्यांनी केली तक्रार

TCS च्या मेलनंतर किमान १८० कर्मचाऱ्यांनी युनियन नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट (NITES) कडे त्यांची तक्रार नोंदवली आहे. कंपनी योग्य माहिती न देता एका शहरातून दुसऱ्या शहरात कर्मचाऱ्यांची बदली करत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर आयटी युनियनने टीसीएसविरोधात कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली आहे. NITES चे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा म्हणाले की, कंपनीने हा निर्णय घेताना कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक आणि आर्थिक समस्यांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. ते म्हणाले की, २००० पैकी बहुतांश कर्मचारी बदलीच्या ठिकाणी गेले आहेत, मात्र तरीही १५० ते २०० कर्मचारी तसे करण्यास टाळाटाळ करीत आहेत.

हेही वाचाः Tata Technologies IPO : अखेर मुहूर्त सापडला! टाटांचा ‘हा’ IPO पुढील आठवड्यात उघडणार

कंपनीने काय उत्तर दिले?

कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, हा एक नियमित निर्णय आहे, जो बहुतेक वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेल्या फ्रेशर्ससाठी लागू केला गेला आहे, परंतु आता त्यांना वास्तविक प्रकल्पांवर तैनात केले गेले आहे. कर्मचाऱ्यांनी केलेल्या आरोपांना कंपनीने उत्तर देण्यास नकार दिला.

Story img Loader