scorecardresearch

Premium

टाटा ग्रुपच्या टीसीएस कंपनीला आठवड्याभरात दुसऱ्यांदा लाखो डॉलर्सचा दंड, नेमकं प्रकरण जाणून घ्या

गेल्या आठवड्यात TCS ला Epic Systems प्रकरणात १४० दशलक्ष डॉलर दंड ठोठावण्यात आला. अमेरिकन न्यायालयाच्या या निर्णयांमुळे टीसीएसचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Tata Consultancy Services
टाटा ग्रुपच्या टीसीएस कंपनीला आठवडाभरात दुसऱ्यांदा लाखो डॉलर्सचा दंड, नेमकं प्रकरण जाणून घ्या (फोटो क्रेडिट – फायनान्शिअल एक्सप्रेस)

Tata Consultancy Services: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला एका आठवड्यात दोन मोठे झटके बसले आहेत. अमेरिकन कोर्टाने TCS ला २१० दशलक्ष डॉलर दंड ठोठावला आहे. डीएक्ससी टेक्नॉलॉजीने कंपनीवर व्यापार गुपिते चोरल्याचा आरोप केला होता. DXC पूर्वी CSC म्हणून ओळखले जात होते. डीएक्ससीच्या खटल्याची सुनावणी करताना टेक्सास कोर्टाने हा निर्णय दिला आहे. मात्र, टीसीएसने या निर्णयावर आक्षेप घेतला असून, हे प्रकरण पुन्हा सुनावणीसाठी नेणार असल्याचे म्हटले आहे. गेल्या आठवड्यात TCS ला Epic Systems प्रकरणात १४० दशलक्ष डॉलर दंड ठोठावण्यात आला. अमेरिकन न्यायालयाच्या या निर्णयांमुळे टीसीएसचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

अवघ्या आठवड्यापूर्वी १४० दशलक्ष डॉलर दंड आकारण्यात आला होता

फक्त एक आठवड्यापूर्वी यूएस सुप्रीम कोर्टाने, एपिक सिस्टीम्सच्या याचिकेवर सुनावणी करताना TCS वर १४० दशलक्ष डॉलर दंड ठोठावला होता. भारतीय कंपनीवर बौद्धिक संपदा चोरल्याचा आरोप होता. यानंतर TCS ने माहिती दिली होती की, त्यांना चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत १२५ दशलक्ष डॉलरचे नुकसान होण्याची अपेक्षा आहे.

Potholes and large holes in pavement slabs before paverblocks are installed
पेव्हरब्लॉक बसवण्यापूर्वीच खड्डे, पदपथाच्या स्लॅबला मोठी छिद्रे; कोपरखैरणे सेक्टर १५-१६ मधील प्रकार
mumbai municipal corporation marathi news, mumbai 48000 illegal hoardings marathi news
मुंबईत गेल्या वर्षभरात ४८ हजार बेकायदा फलकांवर कारवाई, गुन्हा मात्र २२ प्रकरणांतच; कारवाईतील तफावतीवर उच्च न्यायालयाचे बोट
1700 houses will be drawn under 20 percent scheme from MHADA Pune division Pune
लोकसभेच्या तोंडावर पुणेकरांना गिफ्ट; म्हाडाकडून १७०० घरांची सोडत
A Congress officebearer petition demands that the polling date be required on the VVPAT ticket
‘व्हीव्हीपॅट’च्या चिठ्ठीवर मतदानाची तारीख आवश्यक; काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याची याचिकेद्वारे मागणी

हेही वाचाः गौतम सिंघानिया यांनी अखेर मौन सोडले, रेमंड ग्रुपच्या बोर्ड अन् कर्मचाऱ्यांना लिहिला भावनिक ईमेल

नोकरी देऊन सॉफ्टवेअरची माहिती गोळा केली

CSC आणि Transamerica यांनी २०१४ मध्ये भागीदारी केली. TCS ट्रान्सअमेरिकाच्या सहकार्याने काम करीत होती. यानंतर २०१९ मध्ये DXC ने TCS वर ट्रान्सअमेरिकाच्या २२०० कर्मचाऱ्यांना नोकऱ्या दिल्याचा आरोप केला. त्यांच्या मदतीने त्याला CSC सॉफ्टवेअरचे ज्ञान मिळवले. कॉम्प्युटर सायन्सेस कॉर्पोरेशन आणि अपाचे यांच्या विलीनीकरणाद्वारे DXC तंत्रज्ञानाची स्थापना झाली. न्यायालयाने सांगितले की, टीसीएसने डीएक्ससीचे दोन सॉफ्टवेअर वापरून आपले सॉफ्टवेअर तयार केले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध व्यापार गुपिते चोरल्याचा आरोप सिद्ध झाला आहे.

हेही वाचाः नारायण मूर्ती अन् बिल गेट्सनंतर आता थरूर यांची कामाच्या तासांच्या वादात उडी; ‘हे’ विधान करत म्हणाले…

टीसीएस यापुढे लढणार आहे

कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही या निर्णयाचा आदरपूर्वक विरोध करतो आणि उच्च न्यायालयात जाणार आहोत. कंपनीने अमेरिकन मार्केटमध्ये कोणतीही चूक केली नाही. आमच्यावरील आरोप खोटे आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tata group tcs company fined millions of dollars for the second time in a week know the exact case vrd

First published on: 28-11-2023 at 12:13 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×