नवी दिल्ली : टाटा मोटर्सकडून जग्वार लँड रोव्हरच्या (जेएलआर) आलिशान मोटारींचे उत्पादन भारतात केले जाणार आहे. यासाठी तमिळनाडूत १ अब्ज डॉलर गुंतवणूक करून प्रकल्प उभारण्याची योजना कंपनीने आखली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा >>> Gold-Silver Price on 18 April 2024: सोन्याच्या भावात फेरबदल, १० ग्रॅमचा दर आता…

पहिल्यांदाच भारत जग्वार लँड रोव्हरच्या मोटारींचे उत्पादन भारतात होणार आहे. या मोटारींची विक्री देशात होईल आणि त्यांची निर्यातही केली जाणार आहे. सध्या या मोटारींचे तीन उत्पादन प्रकल्प ब्रिटनमध्ये असून, चीन, ब्राझील आणि स्लोव्हाकियामध्येही प्रकल्प आहेत. टाटा मोटर्सने २००८ मध्ये ही कंपनी ताब्यात घेतली. टाटा मोटर्सने मार्च महिन्यात तमिळनाडूत उत्पादन प्रकल्प उभारण्याची घोषणा केली होती. परंतु, त्या प्रकल्पातून नेमक्या कोणत्या मोटारींचे उत्पादन होणार आणि त्याची क्षमता किती असेल, याबाबत मौन बाळगले होते.

हेही वाचा >>> स्मॉल कॅप फंडांमधील मालमत्ता २.४३ लाख कोटींवर

जग्वार लँड रोव्हर ब्रँडच्या रेंज रोव्हर एव्होक, डिस्कव्हरी स्पोर्ट आणि जग्वार एफ-पेस या तीन मोटारींची विक्री भारतात होते. ब्रिटनमधून पूर्ण मोटारीच्या स्वरूपात अथवा सुटे भाग आयात करून पुण्याजवळील प्रकल्पात बांधणी करून त्यांची भारतात विक्री केली जाते. महसुलात दोन तृतीयांश हिस्सा मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात टाटा मोटर्सच्या एकूण महसुलात जग्वार लँड रोव्हरचा वाटा दोन तृतीयांश होता. त्यामुळे कंपनीने ५ वर्षांत प्रथमच वार्षिक नफा नोंदविला होता. रेंज रोव्हर एसयूव्ही आणि जग्वार सलूनला मोठी मागणी असल्यामुळे कंपनीच्या व्यवसायात वाढ झाली होती.