scorecardresearch

Premium

अर्थसंकल्पातील नवीन कर तरतुदींचा टाटा ट्रस्टसह धर्मादाय संस्थांना फटका

कर कायद्यातील प्रस्तावित दुरुस्त्यांचा मोठा फटका देणगीदार संस्थांना बसणार आहे. यात देणगी देणाऱ्या कंपन्यांच्या विश्वस्त संस्था आणि तळागाळात काम करणाऱ्या संस्थांचा समावेश आहे.

अर्थसंकल्पातील नवीन कर तरतुदींचा टाटा ट्रस्टसह धर्मादाय संस्थांना फटका ( छायाचित्र लोकसत्ता ग्राफिक्ट टीम)
अर्थसंकल्पातील नवीन कर तरतुदींचा टाटा ट्रस्टसह धर्मादाय संस्थांना फटका ( छायाचित्र लोकसत्ता ग्राफिक्ट टीम)

केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेल्या कर कायद्यातील प्रस्तावित दुरुस्त्यांचा फटका टाटा ट्रस्टसह देशातील इतर धर्मादाय आणि ना-नफा तत्त्वावर कार्यरत संस्था आणि देणगी देणाऱ्या बड्या कंपन्यांना बसणार आहे. नव्या प्रस्तावानुसार देणगीदारांसाठी प्राप्तिकर रचनेत बदल करण्यात येणार आहे.

हेही वाचा- Gold-Silver Price on 23 February 2023: सोने-चांदी खरेदीची चांगली संधी, उच्चांकी पातळीपेक्षा सोने स्वस्त, तर चांदीचे दर स्थिर

hardip singh puri
शहरे आणि नगरांच्या परिवर्तनासाठी २०१४ पासून १८ लाख कोटींहून अधिक गुंतवणूक : हरदीप एस पुरी
Anil-deshmukh
कंत्राटी भरती करणाऱ्या कंपन्या भाजप नेत्यांच्या, अनिल देशमुख म्हणाले ‘जातनिहाय सर्वेक्षण…’
Difficulty social organizations stalling prostitution women rehabilitation project
देहविक्री महिला पुनर्वसन प्रकल्पाच्या आशा धुसर; महिलांचे मतपरिवर्तन करणाऱ्या सामाजिक संस्थांपुढे पेच
ngo manali bahuudeshiya seva sanstha work for mentally handicapped children
मानसिकदृष्टय़ा अपंग बालकांच्या पंखांना अर्थबळ हवे! नाशिकच्या मनाली संस्थेची साद

एखाद्या धर्मादाय संस्थेने दुसऱ्या धर्मादाय संस्थेला देणगी दिल्यास केवळ ८५ टक्के देणगी ही देणगीदार संस्थेसाठी प्राप्तिकर सवलतीस प्राप्त असेल, असे प्रस्तावित वित्त विधेयक आहे. ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देणगीदार संस्थांना यामुळे मोठा फटका बसणार आहे. यात देणगी देणाऱ्या कंपन्यांच्या विश्वस्त संस्था आणि तळागाळात काम करणाऱ्या संस्थांचा समावेश आहे. टाटा ट्रस्ट ही जगातील सर्वांत मोठी देणगीदार संस्था आहे. अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण संरक्षण क्षेत्रात ट्रस्ट काम करीत आहे. प्रस्तावित तरतुदींबाबत प्रतिक्रिया देण्यास मात्र टाटा ट्रस्टच्या प्रवक्त्यांनी नकार दिला.

प्रस्तावित तरतुदीवर सनदी लेखापाल विरेन मर्चंट म्हणाले, ‘हा धर्मादाय संस्था आणि दात्या संस्थांना चांगले काम करण्यास अडथळा आणणारा बदल आहे. एका धर्मादाय संस्थेने दुसऱ्या धर्मादाय संस्थेला दान केल्यास त्यातील १५ टक्के खर्चावर प्राप्तिकर सवलत नाकारणे म्हणजे छोट्या धर्मादाय संस्थांना मिळणाऱ्या निधीला कात्री लावण्याचा प्रकार आहे. यामुळे त्यांचे निधीचे स्रोत कमी होतील.’

हेही वाचा- सोनं खरेदी करताय? भारतातील ‘या’ शहरांमध्ये मिळतं सर्वात स्वस्त सोनं, नाव ऐकून हैराण व्हाल!

धर्मादाय संस्थांनी प्रस्तावित विधेयकाच्या विरोधात सरकारला आवाहन करण्याचे नियोजन केले आहे. प्रस्तावित तरतूद मागे घ्यावी अथवा त्यात दुरुस्ती करावी म्हणजे तळागाळात सुरू असलेल्या धर्मादाय संस्थांच्या कामावर परिणाम होणार नाही, असे संस्थांचे म्हणणे आहे. अलीकडेच मुंबईत या संस्थांशी संलग्न २५० हून अधिक प्रतिनिधींच्या बैठकीत त्या संबंधाने चिंता व्यक्त करण्यात आली आणि ‘असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ पब्लिक ट्रस्ट्स ॲण्ड चॅरिटीज्’ या व्यासपीठाखाली केंद्रीय अर्थंमंत्र्यांना संयुक्त निवेदन दिले जाणार आहे.

हेही वाचा- ‘एअर इंडिया’ची लवकरच भरती मोहीम; नवीन ४७० विमानांसाठी ६,५०० हून अधिक वैमानिकांची गरज

याबाबत ‘सेंटर फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ फिलॉन्थ्रॉपी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी नोशिर दादरवाला म्हणाले की, प्रस्तावित तरतूद ही देशभरातील हजारो संस्थांच्या कामात बाधा आणणारी आहे. व्यवसायसुलभ वातावरणासाठी जसा ध्यास दिसत आहे, याचप्रमाणे देणगी देण्यातही सुलभताही हवी. समाज कल्याण आणि विकासासाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना पूरकच धर्मादाय संस्था काम करीत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tata trusts and charities hit by new tax provisions in budget ppd 88 dpj

First published on: 24-02-2023 at 11:15 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×