लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: देशातील सर्वात मोठी माहिती-तंत्रज्ञान कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा (टीसीएस) एकत्रित निव्वळ नफा सरलेल्या जानेवारी-मार्च तिमाहीत १४.८ टक्के वाढीसह ११,३९२ कोटी रुपयांवर पोहोचल्याचे कंपनीकडून बुधवारी जाहीर करण्यात आले. कंपनीने वर्षभरापूर्वी याच तिमाहीत ९,९५९ कोटी रुपयांचा करोत्तर निव्वळ नफा नोंदविला होता. टीसीएसच्या या सरस कामगिरीतून, मार्च तिमाहीच्या निकाल हंगामाला दमदार सुरुवात झाली आहे.

infosys profit rs 7969 crore in fourth quarter
इन्फोसिसचा तिमाही नफा ७,९६९ कोटींवर; मार्चअखेर तिमाहीत ३० टक्क्यांची दमदार वाढ
TCS Announces 9 percent Rise, Q4 Net Profit, Rs 12 thousand 434 Crore, Declares Final Dividend, Rs 28 per Share, tata consultancy services, finance article, finance news, share market, stock market,
टीसीएसला १२,४३४ कोटींचा नफा; तिमाहीगणिक ९.१ टक्के वाढ
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  

बाजार भांडवलानुसार, देशातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपनीच्या महसुलात १६.९ टक्क्यांची वाढ झाली असून, तो ५९,१६२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जो गेल्या वर्षी याच तिमाहीत ५०,५९१ कोटी रुपये होता.

आणखी वाचा-‘एलआयसी’चा अदानी समूहावरील विश्वास कायम; तिमाहीत चार कंपन्यांमधील गुंतवणुकीत भर

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, युरोपीय देशांमधून मिळणाऱ्या महसुलाचा एकूण महसुलात १७ टक्के वाटा राहिला. तर सरलेल्या तिमाहीत कंपनीच्या सेवांसाठी १० अब्ज डॉलर मूल्याची मागणी नोंदवण्यात आली. तर आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी एकूण करार मूल्यानुसार त्याचे मूल्य ३४ अब्ज डॉलर होते. कंपनीच्या संचालक मंडळाने प्रति समभाग २४ रुपयांचा अंतिम लाभांश जाहीर केला आहे.

सरलेल्या आर्थिक वर्षांची अखेर अतिशय दमदारपणे झाली असून कंपनीच्या सर्वच विभागांची कामगिरी चांगली राहिली, असे टीसीएसचे मुख्याधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन म्हणाले. जागतिक पातळीवर अस्थिरता असली तरी कंपनीने नवीन मागणी व कार्यादेशात वाढ नोंदवली आहे. येत्या काही महिन्यांत टीसीएसच्या नेतृत्वातील बदल अतिशय सुरळीतपणे पार पडेल. तसेच आगामी काळात कंपनी विविध क्षेत्रांत नवीन संधी मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहील, असेही ते म्हणाले.

आणखी वाचा- मोठ्या खासगी बँकेने FD वरचे व्याज वाढवले, जाणून घ्या नवे दर

येत्या १ जूनपासून खांदेपालट

के. कृतीवासन येत्या १ जूनपासून व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार विद्यमान मुख्याधिकारी राजेश गोपीनाथन यांच्याकडून औपचारिकपणे स्वीकारतील, असे कंपनीने एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले.

तिमाहीत केवळ ८२१ कर्मचाऱ्यांची भरती

कंपनीने सरलेल्या तिमाहीत केवळ ८२१ नवीन कर्मचारी जोडले आहेत. त्यासह कंपनीतील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या आता ६,१४,७९५ वर पोहोचली आहे. वार्षिक ५ लाखांहून अधिक वेतनश्रेणी असलेल्या कर्मचारी संख्या असलेली ही खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे.