Premium

खुल्या बाजार विक्री योजनेंतर्गत ई-लिलावात बोली लावणाऱ्या २२५५ जणांना केंद्राने केली गहू अन् तांदळाची विक्री

तांदूळ, गहू आणि गव्हाचे पीठ यांच्या किरकोळ बाजारातील किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी केंद्र सरकारनं घेतलेल्या पुढाकाराचा एक भाग म्हणून गहू आणि तांदूळ यांचे साप्ताहिक लिलाव करण्यात येत आहेत.

Open Market Sale Scheme
(फोटो क्रेडिट- फायनान्शिअल एक्सप्रेस)

खुल्या बाजार विक्री योजनेंतर्गत १५ वा ई-लिलाव बुधवार ४ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आला. या ई-लिलावामध्ये बोली लावणाऱ्या २२५५ जणांना १.८९ लाख मेट्रीक टन गहू आणि ०.०५ लाख मेट्रीक टन तांदूळ यांची विक्री करण्यात आली. यावेळी देशभरातल्या ४८१ गोदामातील २.०१ लाख मेट्रीक टन गहू आणि २६४ गोदामांतील ४.८७ लाख मेट्रीक टन तांदळाचा लिलाव पुकारण्यात आला होता. तांदूळ, गहू आणि गव्हाचे पीठ यांच्या किरकोळ बाजारातील किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी केंद्र सरकारनं घेतलेल्या पुढाकाराचा एक भाग म्हणून गहू आणि तांदूळ यांचे साप्ताहिक लिलाव करण्यात येत आहेत. या ई-लिलावात तांदूळ आणि गहू यांच्या खरेदीत पॅनेलवर असलेले २२४७ खरेदीदार सहभागी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचाः SBI Chairman: सरकारने स्टेट बँकेचे चेअरमन दिनेश खारा यांचा कार्यकाळ वाढवला, ते SBI चे चेअरमन किती काळ राहणार?

देशभरात सामान्य दर्जाच्या गव्हाची सरासरी विक्री किंमत २१८५.०५ रुपये प्रति क्विंटल होती तर राखीव दर २१५० रुपये प्रति क्विंटल होता. शिथिल वैशिष्ट्यांअंतर्गत (युआरएस) असलेल्या गव्हासाठी सरासरी विक्री किंमत २१९३.१२ रुपये प्रति क्विंटल तर राखीव दर २१२५ रुपये प्रति क्विंटल होता. देशभरात तांदळाची सरासरी विक्री किंमत २९३२.९१ रुपये प्रति क्विंटल होती तर राखीव दर २९३२.८३ रुपये प्रति क्विंटल होता.

हेही वाचाः व्हेज थाळी १७ टक्क्यांनी झाली स्वस्त, CRISIL ने सांगितले ‘हे’ कारण

ई-लिलावाच्या आताच्या फेरीत किरकोळ किमतीमध्ये घट करण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी खरेदीदारांना कमाल १० टनापासून १०० टन गहू तर १० टनापासून १००० टन तांदूळ खरेदीची मुभा आहे. यामुळे छोट्या तसंच खरेदी साखळीत सहभागी झालेल्या परिघावरच्या घटकाना प्रोत्साहन मिळेल आणि त्यामुळे जास्तीत जास्त खरेदीदार पुढे येतील आणि त्यांना त्यांच्या पसंतीच्या गोदामातील हव्या त्या प्रमाणातील धान्यासाठी बोली लावता येईल. साठेबाजी होऊ नये म्हणून देशांतर्गत खुल्या बाजारातील विक्री योजनेअंतर्गत होणाऱ्या गहू खरेदीपासून व्यापाऱ्यांना दूर ठेवण्यात आले आहे आणि खुल्या बाजारातील विक्री योजनेतील गहू खरेदीदार असलेल्या आणि गव्हावर प्रक्रिया करणाऱ्यांच्या धान्य दळणाऱ्या गिरण्यांवर लक्ष ठेवून त्यांची तपासणी केली जात आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The center sold 1 89 lakh metric tonnes of wheat and 005 lakh metric tonnes of rice to 2255 bidders in e auction under the open market sale scheme vrd

First published on: 05-10-2023 at 19:17 IST
Next Story
एसबीआयच्या करोडो ग्राहकांसाठी नवी सुविधा, आता घरबसल्या बँकिंग सेवा मिळणार