scorecardresearch

Premium

वेदांताशी करार मोडला अन् फॉक्सकॉनला मिळणार ‘या’ कंपनीचा पाठिंबा, भारतात सेमीकंडक्टर प्लांट उभारण्याचे स्वप्न येणार पूर्णत्वास

फॉक्सकॉन ही तैवानची उत्पादन कंपनी आहे, तर एसटी मायक्रो ही फ्रेंच इटालियन कंपनी आहे. या दोन्ही कंपन्यांना ४० नॅनोमीटर चिप प्लांट उभारण्यासाठी भारत सरकारला मदत करायची आहे.

foxconn
(फोटो क्रेडिट- प्रातिनिधिक)

जगातील आघाडीची तैवानची सेमीकंडक्टर कंपनी फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यासाठी वेदांताबरोबरचा करार तुटला आहे. आयफोनचे पार्ट्स बनवणारी कंपनी फॉक्सकॉनचा करार मोडल्यानंतर कंपनीला नवा पार्टनर सापडला आहे. त्यानंतर आता भारतात सेमीकंडक्टर प्लांट उभारण्याचे स्वप्न पूर्णत्वास येण्याची शक्यता आहे. वेदांताबरोबरचा करार तुटल्यानंतर फॉक्सकॉनला STMicroelectronics NV चा पाठिंबा मिळणार आहे. भारतात प्लांट उभारण्यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये बोलणी सुरू आहेत.

दोन्ही कंपन्या सरकारला पाठिंबा देणार

फॉक्सकॉन ही तैवानची उत्पादन कंपनी आहे, तर एसटी मायक्रो ही फ्रेंच इटालियन कंपनी आहे. या दोन्ही कंपन्यांना ४० नॅनोमीटर चिप प्लांट उभारण्यासाठी भारत सरकारला मदत करायची आहे. खरं तर भारताला सेमीकंडक्टर्सच्या बाबतीत आत्मनिर्भर व्हायचे आहे. या चिप्स कार, कॅमेरा, प्रिंटर आणि इतर गोष्टींमध्ये बसवल्या जातात. STMicro च्या आधी फॉक्सकॉनने अब्जाधीश अनिल अग्रवाल यांच्या वेदांता रिसोर्सेससह सेमीकंडक्टर प्लांट उभारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, वर्षभराच्या किरकोळ प्रगतीनंतर ही भागीदारी तुटली.

Startup Valuation Many Other Types
Money Mantra : युनिकॉर्न व्यतिरिक्त इतर अनेक प्रकारचे स्टार्टअप, जाणून घ्या ‘हेक्टोकॉर्न’ म्हणजे काय?
Modern system in local
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकलमध्ये आधुनिक यंत्रणा; एसआयएएस, एडीएएस प्रणालीमुळे संभाव्य अपघात टळणार
iPhone 14 Plus available at Rs 73,999
iPhone 14 Plus स्वस्तात खरेदी करण्याची संधी; ‘या’ ठिकाणी मिळतोय ३६ हजारांचा डिस्काउंट
RBI
…तर दररोज ५ हजार रुपयांचा दंड; आरबीआयने बँका, एनबीएफसींना दिले ‘हे’ आदेश

हेही वाचाः Money Mantra : किसान विकास पत्रावर आता एफडीच्या बरोबरीने व्याज मिळणार, नेमका फायदा अन् तोटा समजून घ्या

फॉक्सकॉनचा भारतावर विश्वास

फॉक्सकॉन ही जगातील सर्वात मोठ्या करार निर्मिती कंपन्यांपैकी एक आहे. हे ऍपलसाठी आयफोनच्या भागांसह अनेक उत्पादने बनवते. कंपनीचे उत्पादन पूर्वी चीन देशावर आधारित होते, जे आता भारतातही हलवले जात आहे. फॉक्सकॉनची भारतात इलेक्ट्रिक वाहन कारखाना सुरू करण्याचीही योजना आहे. येत्या काही वर्षांत भारत चीनची जागा घेणार असून, जगातील उत्पादन केंद्र बनवू शकतो, असंही कंपनीचे अध्यक्ष नुकतेच म्हणाले होते.

हेही वाचाः एकेकाळी भारतावर राज्य केलेल्या ब्रिटनचे दुसरे मोठे शहर झाले कंगाल, करोडोंच्या थकबाकीनंतर ‘या’ शहरानं खर्चावर आणले निर्बंध

फॉक्सकॉनलाही मेक इन इंडियाची ताकद मान्य

फॉक्सकॉन कंपनीचे सीईओ यंग लिऊ यांनीही भारताच्या मेक इन इंडियामध्ये क्षमता असल्याचे मान्य केले आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यंग लिऊ यांनी नुकत्याच तैपेई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींचे पुन्हा एकदा कौतुक केले असून, भारताच्या उत्पादनावर आणि मेक इन इंडियावर विश्वास व्यक्त केला आहे. भारताच्या मेक इन इंडिया प्रकल्पामुळे येथे गुंतवणुकीच्या नव्या संधी खुल्या झाल्या आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, आगामी काळात भारत जगासाठी एक उत्पादन केंद्र म्हणून उदयास येऊ शकतो.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The deal with vedanta broke and foxconn will now set up a semiconductor plant in india with stmicroelectronics nv company vrd

First published on: 08-09-2023 at 10:00 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×