scorecardresearch

गोयल सॉल्ट ‘आयपीओ’द्वारे १८.१६ कोटी उभारणार!

पुढील वर्षी ऑक्टोबरपर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित असलेल्या नव्या प्रकल्पातून कंपनी शुद्ध मीठ उत्पादनाची क्षमता सध्याच्या प्रति दिन ७०० टनांवरून, १६०० टनांवर जाईल, असे गोयल यांनी सांगितले.

Goyal Salt expects raise 18.16 crores IPO
गोयल सॉल्ट 'आयपीओ'द्वारे १८.१६ कोटी उभारणार! (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: राजस्थानमधील प्रसिद्ध सांभर तलावाला लागून असलेल्या नवा सिटी येथे सुसज्ज रिफायनरीद्वारे तेथील जमिनीतील खाऱ्या पाण्याद्वारे शुद्ध मीठ तयार करणारी गोयल सॉल्ट लिमिटेडने ‘एनएसई इमर्ज’ या बाजारमंचावर सूचिबद्धतेसाठी प्रारंभिक समभाग विक्री प्रस्तावित केली आहे. प्रत्येकी ३६ ते ३८ रुपये किमतपट्ट्यासह ही समभाग विक्री २६ ते २९ सप्टेंबरदरम्यान सुरू राहील आणि त्यायोगे १८.१६ कोटी रुपये उभारले जाणे कंपनीला अपेक्षित आहे.

Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Sharad Pawar on Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe
शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून वाद, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला काही…”
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का

कंपनीकडून घरगुती खाद्य मिठासह, औद्योगिक वापराच्या मिठाचीही निर्मिती केली जाते. कंपनीचे दर्जेदार तिहेरी-रिफाइन्ड फ्री-फ्लो आयोडीनयुक्त मीठ, दुहेरी-फोर्टिफाइड मीठ आणि तिहेरी-रिफाइन्ड अर्ध-कोरडे मीठ हे उत्तर भारतातील १३ राज्यांमध्ये प्रामुख्याने विकले जाते. कंपनीचा मार्च २०२३ अखेर वार्षिक महसूल ११७.७१ कोटींचा असून, त्यामध्ये तीन वर्षांत वार्षिक सरासरी २५ टक्के दराने वाढ झाली आहे. यातील सरकारकडून आलेल्या मागणीचाही मोठा वाटा राहिला असून, चालू वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असल्याने कंपनीला याच गतीने महसुली वाढ अपेक्षित असल्याचे, गोयल सॉल्टचे अध्यक्ष राजेश गोयल यांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि झारखंडमध्ये सरकारने सार्वजनिक वितरण प्रणाली आणि पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत घरोघरी मोफत शिधावाटपात गोयल सॉल्टच्या मीठच वापरात आणले गेले आहे.

हेही वाचा… मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी आर्थिक नियोजन

या व्यवसायात दशकभराहून अधिक अनुभव असलेली ही कंपनी गुजरातमध्ये नवीन प्रकल्प स्थापित करीत असून, त्यायोगे देशव्यापी विस्तार आणि निर्यात बाजारातील संधींनाही हेरले जाणार आहे. पुढील वर्षी ऑक्टोबरपर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित असलेल्या नव्या प्रकल्पातून कंपनी शुद्ध मीठ उत्पादनाची क्षमता सध्याच्या प्रति दिन ७०० टनांवरून, १६०० टनांवर जाईल, असे गोयल यांनी सांगितले.

होलानी कन्सल्टंट्स प्रा. लि.द्वारे व्यवस्थापित या एसएमई भागविक्रीसाठी गुंतवणूकदारांना किमान ३,००० समभाग आणि नंतर ३,००० च्या पटीत समभागांसाठी बोली लावून अर्ज करता येईल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The goyal salt expects to raise 18 16 crores through ipo print eco news dvr

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×