scorecardresearch

जेएसडब्ल्यू इन्फ्राची प्रत्येकी ११३ ते ११९ रुपये किमतीला २५ सप्टेंबरपासून प्रारंभिक भागविक्री

ही समभाग विक्री २५ सप्टेंबरला खुली होईल आणि ती २७ सप्टेंबरला बंद होईल.

IPO of JSW Infrastructure Company opens from September 25
जेएसडब्ल्यू इन्फ्राची प्रत्येकी ११३ ते ११९ रुपये किमतीला २५ सप्टेंबरपासून प्रारंभिक भागविक्री (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: जेएसडब्ल्यू समूहाचा हिस्सा असलेल्या जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) २५ सप्टेंबरपासून खुली होत आहे. या माध्यमातून २,८०० कोटी रुपयांचा निधी उभारला जाणार असून, कंपनीने प्रति समभाग ११३ ते ११९ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.

Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
The employee boarded the truck to collect the toll from the truck driver
ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र

ही समभाग विक्री २५ सप्टेंबरला खुली होईल आणि ती २७ सप्टेंबरला बंद होईल. गुंतवणूकदार किमान १२६ समभागांसाठी आणि त्यानंतर १२६ समभागांच्या पटीत बोली लावू शकतील. या माध्यमातून मिळणाऱ्या निधीतून कंपनी कर्जफेडीसाठी ८८० कोटी रुपये, एलपीजी टर्मिनल प्रकल्पाच्या भांडवली खर्चासाठी ८६५ कोटी रुपये, वीज उपकेंद्र उभारणीसाठी ५९ कोटी रुपये, ड्रेजरची खरेदी आणि उभारणीसाठी १०३ कोटी रुपये, मंगळूरु कंटेनर टर्मिनलच्या विस्तारासाठी १५१ कोटी रुपये खर्च करणार आहे.

हेही वाचा… गोयल सॉल्ट ‘आयपीओ’द्वारे १८.१६ कोटी उभारणार!

कोकणात जयगड बंदर, मूरगाव (गोवा) बंदर सांभाळत असलेली जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर ही बंदराशी निगडित पायाभूत सुविधा उभी करणारी कंपनी आहे. कंपनीकडून जलवाहतुकीशी निगडित सेवा दिल्या जातात. त्यात मालाची हाताळणी, साठवणूक यासह इतर सेवांचा समावेश आहे. कंपनीची माल हाताळणीची वार्षिक क्षमता यंदा ३० जूनअखेरीस १५.८४ कोटी टन होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The ipo of jsw infrastructure company opens from september 25 print eco news dvr

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×