मुंबई: अमेरिकी निवडणुकीचा निकाल अद्याप अधिकृतपणे आला नसला तरी, अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांचे पुनरागमन निश्चित झाले आहे. त्यावर प्रतिक्रिया म्हणून जगभरातील वित्तीय बाजारात साद-पडसादही बुधवारी उमटले. समभाग बाजार तेजीत दिसून आले, तर चलन, कूटचलन, सोने, वस्तू बाजारावर यावरून संमिश्र कल दिसून आला.

रुपयाचा प्रति डॉलर ८४.३० नीचांक

अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुनरागमनाने, तेथील चलन डॉलरने कमावलेल्या मजबुतीने बुधवारी रुपयाला आणखी दुबळे बनविले. परिणामी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया २१ पैशांनी गडगडून ८४.३० या सार्वकालिक नीचांकी पातळीवर घरंगळला. भांडवली बाजारात अव्याहत सुरू राहिलेल्या परकीयांच्या गुंतवणूक माघारीने रुपयाचा घात केला. रिझर्व्ह बँकेच्या संभाव्य हस्तक्षेपानेही रुपयातील पडझड थांबू शकली नाही आणि ८४.३१ या दिवसांतील नीचांकावरून तो जेमतेम सावरताना दिसून आला. युरोपीय महासंघाचे चलन युरो बुधवारी २ टक्क्यांनी आपटला. २०१६ नंतर एका सत्रात या चलनाने अनुभवलेली ही सर्वात मोठी घसरण आहे.

Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
donald trump latest marathi news
विश्लेषण: अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांची अनपेक्षित मुसंडी कशी?
Swiggy shares bid only 12 percent on day one
स्विगी समभागांसाठी पहिल्या दिवशी १२ टक्केच बोली
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”
Donald Trump
विश्लेषण: डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची जागतिक समुदायाला धास्ती का वाटते? शांतता, पर्यावरण, आर्थिक मदतीचे मुद्दे बासनात?

हेही वाचा >>>हिंदुस्थान झिंकमधील अडीच टक्के हिश्शाची अखेर सरकारकडून विक्री; गुंतवणूकदारांना १० टक्के सवलतीत ५०५ रुपयांना समभागांसाठी बोली शक्य

बिटकॉइन विक्रमी उच्चांकावर

माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पुनरागमन कूटचलनासाठी (क्रिप्टोकरन्सी) वरदान ठरेल या आशेने, बुधवारच्या सत्रात सुरुवातीच्या व्यापारात बिटकॉइनने सुमारे ८ टक्क्यांच्या मुसंडीने, मार्चमध्ये स्थापित केलेला ७५,३७९ डॉलरच्या विक्रमी पातळीपुढे मजल मारली. बिटकॉइननंतर जगातील दुसरे लोकप्रिय कूटचलन असलेल्या इथरसह अन्य चलनातही मोठी वाढ झाली. पृथ्वीवरील क्रिप्टोची राजधानी मानल्या जाणाऱ्या अमेरिकेत बिटकॉइनचे ‘कोष’ (स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह) तयार करण्याचे वचन ट्रम्प यांनी यंदाच्या निवडणुकीत दिले. प्रचार मोहिमेत त्यांनी क्रिप्टोतून देणग्या स्वीकारल्या आणि जुलैमध्ये त्यांनी एका परिषदेत क्रिप्टो चाहत्यांची भेटही घेतली होती. बिटकॉइन चालू वर्षात ७७ टक्क्यांनी वधारला आहे.

सोने तीन सप्ताहापूर्वीच्या नीचांकावर

अमेरिकी चलन डॉलरचे मूल्य जवळपास दीड टक्क्यांनी वाढल्याच्या परिणामी सोन्याच्या किमती बुधवारी जवळपास तीन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर घसरल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात ‘स्पॉट गोल्ड’च्या वायदे दीड टक्क्यांनी घसरून प्रति औंस २,७०३.९३ डॉलरवर (भारतीय रुपयांत प्रति १० ग्रॅम ८०,४०० रुपये) उतरले. गेल्या गुरुवारी सोन्याने औंसामागे २,७९०.१५ डॉलरचा विक्रमी उच्चांक गाठला होता. सोन्यातील गुंतवणूकदार आता गुरुवारी फेडरल रिझर्व्हच्या बैठकीवर आणि त्यात व्याजदर कपातीच्या चक्राबाबत कोणते संकेत मिळतात, यावर लक्ष ठेवून आहेत. कपातीची गती कायम राहिल्यास यावर्षी मौल्यवान धातूत जबरदस्त तेजीला मोठी वाट मिळण्याची आशा आहे.

Story img Loader