पुणे : ऊर्जा व पर्यावरणविषयक उत्पादनांचा पुरवठा करणाऱ्या थरमॅक्स कंपनीने सेरेस पॉवर होल्डिंग्ज पीएलसीची उपकंपनी सेरेस पॉवर लिमिटेड या पर्यावरणपूरक ऊर्जा तंत्रज्ञानाच्या विकासाच्या क्षेत्रातील कंपनीशी धोरणात्मक सहयोगाची घोषणा गुरुवारी केली. या भागीदारीमुळे पर्यावरणपूरक हायड्रोजनची किफायतशीर निर्मिती शक्य होणार आहे.

हेही वाचा >>> ई-वाहनांची वार्षिक विक्री ३० ते ४० लाखांवर पोहोचण्याचा अंदाज

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
govinda fan styed at his home as maid
“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Jitendra J Jadhav as new head of Aeronautical Development Agency
Jitendra Jadhav: मराठी माणूस देशासाठी लढाऊ विमानांची निर्मिती करणार, कोण आहेत शास्त्रज्ञ जितेंद्र जाधव?
Petition in court against Nitin Gadkaris ministry about loss of one lakh crores to the country
नितीन गडकरींच्या मंत्रालयामुळे देशाला एक लाख कोटींचा तोटा? न्यायालयात याचिका… काय आहे कारण?

सेरेसच्या प्रगत सॉलिड ऑक्साइड इलेक्ट्रोलिसिस (एसओईसी) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून थरमॅक्ससाठी स्टॅक ॲरे मॉडेल्स (एसएएम) उत्पादित करण्याचा जागतिक परवाना करार या दोन कंपन्यांमध्ये झाला आहे. थरमॅक्स एसएएम बॅलन्स ऑफ मोड्युल (एसबीएम) आणि मल्टि-मेगावॉट एसओईसी इलेक्ट्रोलिसिस मोड्युलही विकसित करणार आहे. तसेच त्याचे व्यावसायिकीकरण करून विक्रीही करणार आहे. या भागीदारीमुळे भारतात व जगभरात एसओईसी तंत्रज्ञानाच्या उपयोगास वेग देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले गेले आहे.

हेही वाचा >>> पीएनजी ज्वेलर्सच्या ‘आयपीओ’त शेवटच्या दिवशी ५९.४१ पट भरणा

सध्याच्या निम्न-तापमान इलेक्ट्रोलिसिस तंत्रज्ञानाच्या तुलनेत २५ टक्क्यांपर्यंत अधिक कार्यक्षम प्रणाली निर्माण करण्यात येणार आहे. औद्योगिक प्रक्रियांमधील उष्णतेतून तयार होणाऱ्या वाफेचे प्रभावीरीत्या उपयोजन करून हायड्रोजननिर्मितीच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याचे उद्दिष्ट या सहयोगापुढे आहे. अमोनिया/खते, पोलाद, शुद्धीकरण प्रकल्प व रसायननिर्मिती अशा कार्बन उत्सर्जन कमी करणे कठीण असलेल्या उद्योग क्षेत्रांना कार्बनमुक्तीच्या दिशेने जाण्यासाठी हे एक उपयुक्त उत्पादन ठरेलणार आहे, असे थरमॅक्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष भंडारी यांनी सांगितले.